Type Here to Get Search Results !

खुमगांव ता. नांदुरा येथील कु. सानवी मनोज काळे हिला सातारा येथे झालेल्या खेलो इंडिया अस्मिता कीक बाक्सिंग स्पर्धेत सुवर्ण.

 खुमगांव ता. नांदुरा येथील  कु. सानवी मनोज काळे हिला सातारा येथे झालेल्या खेलो इंडिया अस्मिता कीक बाक्सिंग स्पर्धेत सुवर्ण.



ही लीग ASMITA (Achieving Sports Mailstone by Inspiring Women through Action) मोहिमेचा एक भाग आहे, जी स्पर्धात्मक खेळांमध्ये महिला लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, स्वसंरक्षण कौशल्य वाढवण्यासाठी आणि तरुण मुलींमध्ये शिस्त वाढवण्यासाठी संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे. "खेलो इंडिया अस्मिता किकबॉक्सिंग लीग" (Khelo India Asmita Kickboxing League) ही एक स्पर्धा आहे जी भारत सरकारचे क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), वाको इंडिया फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते. ही स्पर्धा महाराष्ट्रात भरवली गेली आहे. या स्पर्धेत देशभरातील तरुण महिला खेळाडू भाग घेतात, ज्यात महाराष्ट्रातील खेळाडूंचाही समावेश असतो.

१३ सप्टेंबर २०२५ ला सातारा येथे ही स्पर्धा वाको इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री निलेश शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या स्पर्धेत सर्व रेकॉर्ड मोडीत काढून ८०० ते ९०० महिला क्रीडापटुंनी सहभाग घेतला होता. 

कु. सानवी मनोज काळे हि पुणे येथे किकबॉक्सिंग चैम्पियन म्हणून नावारूपाला येत आहे आणि आपल्या गावाच्या, गुरुंच्या, आणि पालकांच्या आशिर्वादाने या खेळात प्रगती करत आहे. अस्मिता स्पर्धेत या चिमुरडीने कडवी झुंज देत 32 किलो वजन गटामध्ये पॉइंट फाइट  या प्रकारात सुवर्ण पदक मिळवून देशपातळीवर आपल्या गावाचे, गुरुंचे नाव कोरले. त्याबद्दल सानवीचे भरभरून कौतुक होत आहे. 

सानवी सध्या तीचे शालेय शिक्षण ऑर्कीड द इंटरनॅशनल स्कुल निगडी, पुणे येथे घेत आहे.

सानवी श्री शुभम कानडे सरांच्या रुद्र मार्शल आर्ट मध्ये श्री अथर्व सूर्यवंशी सरांच्या मार्गदर्शनाखाली  कराटे व किक बाक्सींग चे प्रशिक्षण घेत आहे

सानवी ला मेडल  देवून सन्मानीत करण्यात आले यावेळेस वाको इंडीया महाराष्ट्र राज्य प्रेसीडेंट श्री निलेश शेलार सर,  रुद्र मार्शल आर्ट चे कोच श्री अथर्व सुर्यवंशी सर उपस्थीत होते.

सानवी च्या मुख्याध्यापिका नयना चौरे यांनी आर्किड स्कूलतर्फे तिचे अभिनंदन केले आहे. ऑर्किड्स स्कूल ने नेहमी त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुनांना प्रोत्साहन व प्रशिक्षण दिले आहे.

जिल्ह्यातुन, परिसरातून, मित्रमंडळींकडून तीचे अभीनंदन होत असून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सानवीने सर्वांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments