Type Here to Get Search Results !

मोताळा तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात.

 मोताळा तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात.



बुलढाणा मोताळा -सोपान पाटील मो. 7028259008


 जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या कारवायांवर अँटी करप्शन विभागाने मोठा हातोडा मारला असून मोताळा तहसीलदार हेमंत पाटील लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. अकोला अँटी करप्शन विभागाने शनिवारी धाडसी कारवाई करून तहसीलदाराला जाळ्यात ओढले. तक्रारदार शेतकऱ्याची वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्यासाठी तहसीलदाराने तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अखेर शेतकऱ्याने अँटी करप्शनकडे तक्रार दाखल केली आणि पथकाने सुयोजित सापळा रचून तहसीलदाराच्या बलढाणा येथील राहत्या घरी स्वीकारताना

दोन लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले. या कारवाईमुळे तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या कारवायांवर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना 

आता  भीती वाटल्या शिवाय राहणार नाही

भ्रष्ट मार्गाने पैसा कमावण्याचा प्रयत्न करण्यात आला तर

त्यांना ही 

अटक भोगावी लागेल अशी चर्चा जन माणसात सुरु झाली आहे.

 अँटी करप्शनच्या या धाडसी कारवाईने पुन्हा एकदा प्रशासनातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना यातून धक्का बसला असेलच.

Post a Comment

0 Comments