Type Here to Get Search Results !

युवा सामाजिक कार्यकर्ते मुकेश भाऊ वाकोडे यांनी नांदुरा सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टर सोबत चर्चा केली.

 युवा सामाजिक कार्यकर्ते मुकेश भाऊ वाकोडे  यांनी नांदुरा सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टर सोबत चर्चा करून सरकारी रुग्णालयातून गोळ्या (Medicines) औषधे ही बाहेरील महागड्या मेडिकल मधून पेशंटला न सांगता  रुग्णालयातच उपलब्ध करून देण्यात यावे असे निर्देश दिले.

नांदुरा प्रतिनिधी . सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषध,गोळ्या (Medicines) सरकारी औषधालयातून किंवा मेडिसिन विभागातून दिल्या जात नाहीत.अशी माहिती मिळताच दि. 15/9/25 रोजी मुकेश भाऊ वाकोडे  यांनी नांदुरा सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टर सोबत चर्चा केली,

सरकारी रुग्णालयातून गोळ्या (Medicines) औषधे ही बाहेरील महागड्या मेडिकल मधून पेशंटला न सांगता लवकरात लवकर इथे उपलब्ध करून देण्यात यावे.

 औषधालयातून आवश्यक गोळ्या औषध दिल्या जात नाहीत.यामुळे रुग्णास उपचार घेण्यात अडथळा निर्माण होत असून, त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. सरकारी रुग्णालय हे नागरिकांसाठी मोफत व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आहे, परंतु या प्रकारामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, जेणेकरून रुग्णालयाच्या माध्यमातून आवश्यक गोळ्या औषध नियमित मिळू शकतील. व सर्वांना उपचार करण्यासाठी मदत मिळेल.

Post a Comment

0 Comments