समृद्धी महामार्गवर डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा जालना महामार्ग पोलिसांकडून पर्दाफास आरोपी वाहन सोडून पसार .
गुलशेर शेख
दिनांक 30 7 2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक रामदास निकम हे अमलदारासह समृद्धी महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना चॅनल नंबर 369 नागपूर कॉरिडोर मोजे निधोना शिवार तालुका जिल्हा जालना येथे ट्रक क्रमांक TG 07 U 7213 ड्रायव्हर योगेंद्र लक्ष्मण सिंह चौव्हाण हे मुंबई हे सदर वाहनात मुंबई येथून नागपूरकडे कच्चामाल घेऊन जात असताना सुमारे सदर चालक हे त्यांचा ट्रक साईडला लावून केबिनमध्ये झोपलेले असताना 04.30 वाजी दरम्यान मारुती सुझुकी सियाज कार क्रमांक एम एच 04 जीबी 20 70 व त्यामध्ये असलेले अनोळखी चार इसम यांनी त्यांचे वाहनातील डिझेल टॅंक फोडून डिझेल चोरी करत असताना चालकाचे निदर्शनास आले त्यावरून चालकाने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील नगदी रुपये 3000 काढून नागपूरच्या दिशेने पळून जात होते सदर चालकाने त्याचा ट्रक तसाच गुंडीवाडी पेट्रोल पंप येथे आणला असता तेथे शिवम तिवारी नावाच्या चालकाच्या ट्रक मधून सुद्धा डिझेल काढण्याचा प्रयत्न होत असताना महामार्ग पोलिसांच्या निदर्शनास आला सदर कार मधील चार तरुणांना पेट्रोल पंप येथील तसेच तेथे असलेल्या हॉटेल चालक यांच्या साह्याने धरण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांचे ताब्यातील कार क्रमांक एम एच झिरो फोर जीबी 20 70 व त्यामध्ये असलेले चोरीचे डिझेल सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले . महामार्ग पोलिसांनी दोन्ही चालक यांना धीर देऊन यातील चालक नामे योगेंद्र लक्ष्मण सिंह चव्हाण यांना सोबत घेऊन पोलीस ठाणे चंदन झिरा येथे तक्रार दिलेली आहे सदर कार मध्ये एकूण प्लास्टिक कॅन मिळून आल्या त्यामध्ये तीन कॅन मध्ये अंदाजे 100 ते 105 लिटर डिझेल होते आठ पैकी पाच कॅन रिकामे आढळून आले कारची तपासणी केली असता कारच्या सीटवर रेडमी कंपनीचा एक मोबाईल हँडसेट व लोखंडी तलवार तसेच डिझेल काढण्यासाठी लागणारे दोन पाईप मिळून आले सदरचा मुद्देमाल एकूण रक्कम दोन लाख 18 हजार आठशे पस्तीस चा मिळून आला सदरचा मुद्देमाल पोलीस ठाणे येथे जमा करून वरील फिर्यादीच्या तक्रारीवरून वरून पोलीस स्टेशन चंदनझिरा येथे चार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई पोलीस स्टेशन चंदनझिरा करीत आहे.
वरील कारवाई मा. पोलीस अधीक्षक रूपाली दरेकर मॅडम मा.पोलीस उपअधीक्षक डिसले, मा. पोलीस निरीक्षक किशोर चौधरी महामार्ग सुरक्षा पथक प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी आर के निकम पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी साळुंके .नामदेव मिसाळ महामार्ग पोलीस केंद्र जालना व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुनील राठोड ,सुशील घागरे, मनोज ,रवी पवार यांनी वरील कारवाई केली आहे.

Post a Comment
0 Comments