वरवट बकाल जि.प. उर्दू शाळेची नवीन शाळा समिती गठीत!
संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण वरवट बकाल
गावातील शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत वरवट बकाल जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेची नवीन शाळा व्यवस्थापन समिती नुकतीच गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी शेख नाझीम शेख हारून यांची निवड झाली असून, उपाध्यक्ष म्हणून सीमा शेख कदीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर सदस्यांमध्ये शेख हुसेन शेख महमूद, शहजान बानो शेख इम्रान, अप्सरा बी शेख शकील, ग्रामपंचायत प्रतिनिधी संतोष टाकळकार, शिक्षणतज्ञ शेख गफूर शेख रज्जाक, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अश्मिरा अब्दुल नईम व मदिहा फातेमा शेख बिस्मिल्ला यांचा समावेश आहे.
सचिवपदी अब्दुल राजीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समिती गठनेप्रसंगी गावातील मान्यवर शेख बिस्मिल्ला शेख रजाक, अब्दुल नईम हकीम देशमुख, शेख जुबेर शेख मोहम्मद, शेख गफूर शेख रज्जाक, शेख शकील शेख वकील, शेख इम्रान शेख मेहबूब, शेख कदीर भाई यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.


Post a Comment
0 Comments