पोलीस ठाण्यातून फरार झालेल्या दरोड्यातील आरोपीच्या नांदुरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
डीबी पथकाची दमदार कामगिरी
नांदुरा -.. सोपान पाटील
पोलिसांच्या ताब्यात असलेला दरोड्यातील आरोपी कवीन बाबू भोसले वय २५वर्षे रा हलखेडा ता मुक्ताईनगर जि जळगाव (खान्देश) याला तपास अधिकाऱ्यांनी चौकशी कामी लॉकअप च्या बाहेर काढून ठाण्यातीलच गुन्हे प्रकटीकरण शाखेत ठेवले असता आरोपीने पोलिसांची नजर चुकवून पोलीस स्टेशनच्या मागील बाजूच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेऊन ज्ञानगंगा नदीच्या दिशेने पळून गेल्याची घटना २० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी एक वाजे दरम्यान घडली होती या घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली होती घटनेच्या दिवसापासून म्हणजे गेल्या ९ महिन्यांपासून नांदुरा पोलीस फरार आरोपीचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होते मात्र या सराईत गुन्हेगाराचा कोठेही ठावठिकाणा मिळत नव्हता तो परागंदा होऊन कायद्याला वाकुल्या दाखवत होता
नांदुरा पोलिसांपुढे आरोपीने एकप्रकारे आव्हानच उभे केले होते नांदुरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने फरार आरोपीला हुडकूनच काढायचे याकरिता आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावले गुप्त बातमीदारांना अॅक्टिव्ह करून आरोपी बाबत खडान खडा माहिती मिळवणे सुरू केले "ते म्हणतात ना कानून के हात बहुत लंबे होते है" तशातच २३ जुलै रोजी एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक खबर मिळाली की दरोड्यातील फरार आरोपी कवीन भोसले हा वडोदा ता मुक्ताईनगर येथे एका गॅरेजवर आपली मोटर सायकल दुरुस्त करीत आहे सुतावरून स्वर्ग सहजासहजी हार मानतील मग ते गाठणाऱ्या पोलिसांनीही मग क्षणाचाही विलंब न करता डीबी
पथकाने तातडीने वडोद्याकडे धाव घेत मोठ्या शिताफिने आरोपीच्या मुस्क्या आवळत नांदुरा पोलीस ठाण्याच्या ज्या लॉक अप मधून तो पळाला होता त्याला तिथेच आणून जेरबंद केले. नांदुरा पोलिसांवर गेल्या ९ महिन्यांपासून आरोपी ठाण्यातून पळाला हा जो डाग लागला होता तो अखेर नांदुरा पोलिसांनीच आपल्या कर्तुत्वाने पुसून काढला ही चमकदार कामगिरी नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली (डीबी) डिटेक्शन ब्रांच चे नापोकॉ राहुल ससाणे, पोकॉ योगेश निंबोळकर, विनोद भोजने, रवी झगरे, सुनील सपकाळ यांनी पार पाडली

Post a Comment
0 Comments