Type Here to Get Search Results !

नांदु-याकडे येणा-या ट्रॅक्टरला आमसरीजवळ मागून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने उडविले.

 नांदु-याकडे येणा-या ट्रॅक्टरला आमसरीजवळ मागून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने उडविले.




भिषण अपघातात ट्रॅक्टरमधील 1 वीट कामगार मजूर ठार

नांदुरा.... सोपान पाटील उपसंपादक.

विट मजुरांसह नांदुऱ्याकडे येत असलेल्या ट्रॅक्टरला मागून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने उडविल्याने झालेल्या भिषण अपघातात एक मजूर ठार झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर असे की ट्रॅक्टर व टिप्पर दोन्हीही नांदुराकडे येत असताना सकाळी सुमारे ११:३० वाजे दरम्यान ग्राम आमसरी जवळील हनुमान मंदिराजवळ ट्रॅक्टरला टिप्परने मागून जोरदार धडक दिली. टिप्पर क्र. MH. 28 1145 त्या भीषण अपघातात ट्रॅक्टर वरील मजूर श्रीराम काशिनाथ काटोले राहणार

नारखेड, वय अंदाजे ४७ हे गंभीर जखमी झाले सदर घटनेची माहिती नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी रवी भाऊ झगरे यांनी ओम साई फाउंडेशन ला दिली असता ओम साई फाउंडेशनचे स्वयं सेवक विलास भाऊ निंबोळकर, कृष्णा वसोकार, गणेश बोचे, राहुल इंगळे, रोहित भोपळे हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी गंभीर जखमी श्रीराम काशिनाथ काटोले यांस नांदुरा सामान्य रुग्णालय येथे दाखल केले. डॉक्टर जैस्वाल साहेब यांनी तपासणीनंतर जखमीस मृत घोषित केले. सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत

Post a Comment

0 Comments