नागपूर बुलडाणा
3/8/2025
गाव माझा न्युज चॅनल चेबुलडाणा जिल्हा प्रतिनिधी तथा पत्रकार राजेंद्र ससाणे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित,!!
दर्पण पत्रकार तथा संपादक फाउंडेशन व विश्व् हम्यान राईट असोशियशन चे वतीने समाज भूषण पुरस्काराचे वितरण,,!!
दर्पण पत्रकार एवं संपादक फाऊंडेशन व विश्व ह्युमन राईट अँड इन्फॉर्मेशन राइट असोसिएशन तर्फे आयोजित समाज भूषण पुरस्कार हा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा म्हणजेच पत्रकारिता,कला, आरोग्य,पोलीस, शिक्षक व समाज सेवेत मोलाचे योगदान देणारे या सर्वांच्या सत्कार सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री संदीपजी जोशी आमदार विधानपरिषद होते. मार्गदर्शक म्हणून श्रीमंत मुधोजी राजे भोसले या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच येहोवा येरे फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री रमेशजी बोरकुटे,अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटना चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरी शंकर शुक्ल,शॉर्ट फिल्म निर्माता श्री आलोक शर्मा, ज्येष्ठ पत्रकार श्री. डी के आरीकर,तर प्रमुख अतिथी म्हणून मिसेस युनिव्हर्स डॉ रिचा झरारीया,अभिनेत्री व मॉडल सोयामी शाहू,अभिनेत्री किरण पितळे, प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट राखी चव्हाण यांनी उपस्थित राहून सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजक श्री सुशील कुमार पांडे, श्री राजेंद्र पाठक, श्री सचिन लिमसे, अल्का सर्जिकल संचालिका तृषाली चौधरी NCC महाराष्ट्र अध्यक्ष सौ. मेरी विल्सन,ह्युमन राईट च्या सौ. कविता लिचडे, गॅलेक्सी स्टुडिओ च्या सौ.संगीता तांबूस्कर यांनी उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाला चंदा ताई कमलाकर, काजल ताई जावळेकर,कविता ताई गायकवाड, युगांत उगले, आदित्य शाहू यांचे सहकार्य लाभले. सत्कार मूर्ती मध्ये गाव माझा न्युज चॅनल चे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी तथा पत्रकार राजेंद्र ससाणे, व पोलीस टाईम 24 न्युज चॅनल चे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी मनोज सना नसे,रोड मार्क फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री राजू भाऊ वाघ,तरुण भारत चे पत्रकार अनिल कांबळे, नवभारत चे पत्रकार अभिषेक तिवारी,दैनिक भास्कर चे पत्रकार अभय यादव,जेष्ठ व्हिडिओ जर्नलिस्ट विनय लोहित,व्हिडिओ जर्नलिस्ट व्यंकटेश नायडू सर,Ibn लोकमत चे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, लोकमत डिजिटल मिडिया च्या अश्विनी पुरी,उपराजधानी वृत्तपत्र चे संजय देशमुख यांचे सह बऱ्याच वेग वेगल्या क्षेत्रात काम करणार्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला,
अहिल्या न्युज 24 करीता कार्य कारी संपादिका सौं सरला ताई राजेंद्र ससाणे ची बातमी
नागपूर,/ बुलडाणा


Post a Comment
0 Comments