नांदुरा तहसील कार्यालय येथे 1ते 7ऑगस्ट महसूल सप्ताह चे आयोजन.. व पत्रकार बांधवाचे स्वागत समारंभ
नांदुरा..... सोपान पाटील उपसंपादक (7028259008)
महसूल विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजना यांचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता व उत्कृष्ट काम करणा-या महसूली अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने महसूल विभागामार्फत देण्यात येणा-या सेवा व राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धीगंत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने 1 ऑगस्ट पासून महसूल सप्ताह साजरा करण्यात आला आहे.
या अंतर्गत तहसिल कार्यालय, नांदुरा मार्फत दिनांकः 1 ऑगस्ट 2025 ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे, या सप्ताहादरम्यान महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करणे, प्रमाणपत्र, दाखले तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक
मंडळनिहाय विशेष सहाय योजनेतील डिबीटी न झालेल्या लाभार्थ्याना घरभेटी करून डिबीटी करून अनुदानाचे वाटप करण्यात आले. आणि पाणद/शिवरस्त्यांची मोजणी करून दुतर्फा झाडे लावणेव याबाबत प्रत्येक मंडळात मंडळ अधिकारी / ग्राम महसूल अधिकारी/महसूल सेवक व गावातील इतर मंडळी यांनी झाडे लावणेबाबत मोहिम पूर्ण केली. सदर माजाहामध्ये सर्व प्रकारचे मिळून एकूण 1155 नाम वितरित करण्यात आले.
या सप्ताहाचा शुभारंभ तालुक्याला नव्याने रूजू झालेले तहसिलदार, श्री अजितराव जंगम साहेब व नायब तहसीलदार श्री. श्रीशैल व्हट्टे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाची सांगता स्वयंसेवी / सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरीक यांच्या उपस्थितीत पुर्ण करण्यात आला त्या सप्ताह दरम्यान होणा-या विविध योजनांचा व कार्यक्रमांचा लाभ नागरीकांनी घेण्याचे आवाहन अजितराव जंगम तहसिलदार, नांदुरा यांचे मार्फत करण्यात आले होते आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात . पत्रकार परिषदेत प्रामुख्याने ज्येष्ठ पत्रकार गणेश आसोरे उमाताई बोचरे,राजू घाटे,सोपान पाटील,किशोर इंगळे, यशवंत पिंगळे,यांच्यासह इतर पत्रकार उपस्थित होते
तसेच ओम साई फाउंडेशन चे विलास भाऊ विलास भाऊ निंबोळकर त्यांचे सहकारी कमलेश भाऊ बोके,किरण इंगळे, आनंद वावगे,अश्विन फेरण,डॉक्टर विजय तायडे,अक्षय राठी, श्याम जुमडे,प्रवीण पारखेडे,प्रेमचंद जैन, गजानन भुसारी, दीपक फाळके,कृष्णा वसुकार,राहुल निमकर्डे,गणेश बोके, नितीन ठाकरे, चंद्रकांत नायसे, विष्णू धांडे, श्रीराम भाऊ निंबोळकर, विकी रामेकर,अमोल ढोले,कपिल पाटील, रितेश तायडे, श्रीकृष्ण ठाकरे,कृष्णा बोंद्रे,श्रीकृष्ण केने आणि राजू खंडारे इत्यादी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या सर्वांचं स्वागत नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे साहेब यांनी केले तर स्टेजवर नायब तहसीलदार एस वी मार्कंड साहेब, नायब तहसीलदार सुभाष शेगोकार साहेब, तर श्री पारस्कर साहेब पारखेडकर साहेब आणि यांनी उत्कृष्टपणे कार्यक्रमाचा आयोजन करून पत्रकारांचा सत्कार केला त्याबद्दल पत्रकार उमाताई बोचरे यांनी पत्रकाराच्यावतीने तहसील कार्यालय नांदुरा चे सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले .



Post a Comment
0 Comments