समाजवादी पार्टीतर्फे उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
जामनेर येथील घटनेबाबत दोषींवर कार्यवाही होणेबाबत. समाजवादी पार्टीने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्यामार्फत देवेंद्रजी फडणवीस साहेब, गृहमंत्री, महाराष्ट राज्य, मुंबई यांना निवेदन
देण्यात आली आहे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की, दिनांक ११/०८/२०२५ रोजी जामनेर जि जळगांव खान्देश येथे सुलेमान पठान या तरूणाला काही समाजकंटकांनी धार्मीक व्देषभावनेतून जबर मारहान केली ज्यामध्ये त्या मुस्लीम तरूणाचा जागीच मृत्यु झाला आहे. ही घटना होवून आज रोजी ३ दिवस उलटून गेले असतांना स्थानीक पोलीसांनी आजपर्यंत मात्र दोन गुन्हेगारांना अटक केली आहे मात्र या घटनेतील इतर अंदाजे १० ते १२ लोकं अदयापही फरार आहेत त्यांचेवर मोकोका कायदयानुसार विनाविलंब कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात व मुस्लीम समाजाबाबात धार्मीक तेढ निर्माण करणा-या समाजकंटांवर शासनाने लगाम लावावा अशी मागणी समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस च्या वतीने करण्यात येत आली आहे. आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या मापदंडानुसार शिक्षा व्हावी अन्यथा समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस च्यावतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले.
वेळेस समाजवादी पार्टीचे पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश सचिवल लियाकतखान सलमान खान
बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस ,तालुका अध्यक्ष मुस्ताक जमदार ,सय्यद बबलू शेख इरफान शेख जमीर सय्यद नाझीम उपस्थित होते सादर निवेदनावर सर्वांच्या सह्या आहेत



Post a Comment
0 Comments