Type Here to Get Search Results !

नवीन समशानभूमीसाठी नांदुरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू.

 नवीन समशानभूमीसाठी नांदुरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू.

नांदुरा...सोपान पाटील उपसंपादक मो. 7028259008


     सविस्तर वृत्त असे आहे की ग्राम तरवाडी येथे नवीन समशान भूमी साठी जागा उपलब्ध करून देण्याकरता तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे आमरण उपोषण नांदुरा तहसील कार्यालयासमोर आज पासून सुरू झाले आहे त्यांच्या प्रमुख मागण्या तरवाडी येथील जुनी समशानभूमी बांधकाम भ्रष्टाचारातील तत्कालीन सरपंच व तत्कालीन सचिव यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी दिनांक 26 .6 .2025 रोजी तरवाडी येथे एका मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार तलाठी कार्यालयासमोर करण्यात आले त्यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली या प्रकरणाचे पूर्ण चौकशी  तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी केली असता तत्कालीन सरपंच व सचिव यांना झालेल्या प्रकरणाबाबत दोषी ठरविण्यात येऊन दिनांक ०२,०७ 2025 रोजी नोटीस बजावली परंतु आजपर्यंत बजावलेल्या नोटीस वर पुढील कोणतीच कारवाई झालेली दिसून येत नाही तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना विचारपूस केली असता उडवाउडुची उत्तरे देऊन उलट आमच्यावर कारवाई करण्याच्या धमक्या देत आहे तरी दोषीवर कठोर कारवाई करून झालेल्या शासनाच्या निधीचा अप व्यवहार रकमेची भरपाई तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून वसूल करून तरवाडी ग्रामस्थांना न्याय द्यावा ही विनंती याकरीता तरवाडी गावातील सरपंच व पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे

Post a Comment

0 Comments