Type Here to Get Search Results !

आर.पी.आय.आंबेडकर पक्षाचे खामगाव आगर प्रमुखांना निवेदन बाळापूर ते लाखनवाडा कायमस्वरुपी बससेवा चालू करणेबाबत

 आर.पी.आय.आंबेडकर पक्षाचे खामगाव आगर प्रमुखांना निवेदन बाळापूर ते लाखनवाडा कायमस्वरुपी बससेवा चालू करणेबाबत .

दिव्य मातृछाया 


सागर सिरसाट 


खामगांव -गेल्या बरेच वर्षांपासून खामगाव आगारातून बससेवा बाळापूर ते लाखनवाडा सुरु होती. परंतु सदर बस गेल्या २ ३ महिन्यापासून कोणतेही कारण न देता बंद करण्यात आलेली आहे.ज्यामुळे लाखनवाडा ते बाळापूर रोडवरील शाळेतील विद्याथ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.


तरी याबाबत तातडीने दखल घेण्यात येऊन बाळापूर ते लाखनवाडा बससेवा पूर्ववत चालू करण्यात यावी. सदर बससेवा येत्या १० दिवसात सुरु न झाल्यास आपले कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे निवेदन खामगाव आगर प्रमुखांना देण्यात आले. सदर सहिनिशी आपले निवेदन देत असताना जिल्हाध्यक्ष दादा पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा कार्याध्यक्ष सागर सिरसाट, तालुका अध्यक्ष गोवर्धन गवई, तालुका सचिव मिलिंद इंगळे, नागेश हेलोडे, निलेश सावधेकर, घाटपुरी सर्कल अध्यक्ष इंदूताई इंगळे तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments