कर्तव्यनिष्ठ पोलिस कर्मचारी आनंद माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
मलकापूर पोलीस विभागात आपल्या सेवेतून प्रामाणिकपणे योगदान देणारे व कर्तव्यदक्ष म्हणून लौकिक मिळवलेले पोलीस कर्मचारी श्री. आनंद माने साहेब यांचा आज वाढदिवस आहे.
पोलीस दल हे समाजाचे रक्षणकर्ते असून, त्यांच्यामुळं नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळते. अशा या कठोर परिश्रम करणाऱ्या दलात आनंद माने यांच्यासारखे जबाबदार, प्रामाणिक व जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहणारे अधिकारी असल्याने समाजात विश्वास निर्माण झाला आहे.
सामाजिक जबाबदारी पार पाडताना माने साहेब नेहमीच कर्तव्याला प्राधान्य देतात. गुन्हेगारीविरोधी कारवाई असो किंवा नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका – त्यांनी दाखवलेली तत्परता ही इतरांसाठी आदर्श ठरली आहे.
त्यांच्या शांत स्वभावामुळे व जनतेशी जिव्हाळ्याच्या वागणुकीमुळे ते नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. "पोलिस म्हणजे फक्त दडपण नव्हे तर समाजाचे आधारस्तंभ" ही प्रतिमा त्यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केली आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर शहरातील नागरिक, मित्रपरिवार व सहकर्मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहेत.
त्यांना आगामी आयुष्यात उत्तम आरोग्य, यश, आनंद व दीर्घायुष्य लाभो हीच सर्वांची मनःपूर्वक प्रार्थना. 🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आनंद माने साहेब! 🎂🌹

Post a Comment
0 Comments