विद्यार्थ्यांच्या अपघातानंतर वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर
अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्याला वाहन देऊ नका : विलास पाटील...
खाजगी शिकवणी व महाविद्यालयासमोर कारवाई होणार सुरू
*वर्धा* : १८ वर्षांखालील विद्यार्थी विद्यार्थिनीला ५० सीसीहून जास्त क्षमतेची दुचाकी चालवताना आढळल्यास २५ हजार रुपये दंड व १८ वर्षांचे होईपर्यंत वाहन परवाना देऊ नका, असा आदेश परिवहन आयुक्तांनी दिला आहे. मात्र, या प्रकरणात वर्धैत अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अनेक अल्पवयीन मुले-मुली दुचाकी सुसाट पळवत असल्याचे पाहायला मिळते.
शहरातील रामनगर परिसरातील जनता चौकात शुक्रवारी ट्रकने दोन शाळकरी विद्यार्थी ई-बाईकने खाजगी शिकवणी वरून घरी परत जात असताना अपघात झाला, त्यात पंधरा वर्षीय मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला,
शाळकरी विद्यार्थी व अन्य अल्पवयीन मुलांच्या हातात स्कूटर, दुचाकी वाहने सर्रास दिसून येत असून सुसाटपणे धावणार्या या वाहनांचा सुळसुळाट हा रस्त्यावर चालणार्या लोकांसह इतर वाहनधारक व स्वतः अल्पवयीन वाहन चालकासाठी धोकादायक व अपघाताला निमंत्रण ठरत आहे. विनापरवाना अल्पवयीन वाहन चालकांमुळे त्यांच्यासह मार्गावरील वृद्ध नागरिक, शाळकरी विद्यार्थी, वाहनधारक व पादचार्यांचे देखील जीव धोक्यात येऊ शकतात. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणार्या पालकांवर कठोर कारवाईची तरतूद असली तरी कारवाईची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने त्यांचे मनोधैर्य वाढत आहे. दुचाकी वाहनावर किती प्रवासी बसावेत याचे भान देखील हे अल्पवयीन विनापरवाना वाहनधारक ठेवत नसल्याचे दृष्टीस पडत आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अल्पवयीन वाहन चालवणारे वाहन चालक, मालक व पालक यांच्यावर मोटार वाहन कायदा व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मोहीम वाहतूक पोलिस यंत्रणेने सुरू करणार आहे, सैराट दुचाकीस्वार व अल्पवयीन शाळकरी वाहन चालकांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे. ही मोहीम खाजगी शिकवणे शिकवणे महाविद्यालय या परिसरात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी सांगितले,
*१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्याला वाहन देऊ नका* :
पाल्यांना खाजगी शिकवणी तसेच महाविद्यालयात सोडण्यासाठी अनेक पालकांना नोकरी, व्यवसाय, कामानिमित्त वेळ मिळत नाही. स्कूटी अन्य वाहने खरेदी करून पाल्यांना दिली जातात.
हेच अल्पवयीन वाहनचालक मुला-मुलींची संख्या रस्त्यावर जास्त असल्याचे दिसून येते. क्लासला जाण्यासाठीही ते वाहनांचा वापर करतात. महाविद्यालयाच्या आवारात हे अल्पवयीन विद्यार्थी ट्रीपल सीट जातानाही दिसून येतात.
म्हणून १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकी चालविण्यास देऊ नका असे आव्हान वाहतूक शाखा करीत आहे.
****************
अल्पवयीन लहान मुलांनी वाहन चालवीने ज्यांचे जवळ लायसेन्स नाही अशा ५२ विद्यार्थ्यांंवर वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम 4(1)/181 कलमनवये कायदेशीर कार्यवाही करून ५३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, वाहतूक नियम पालन करावे याबाबत जनजागृती करण्यात आली आहे, तरी यांनतर अपघात होऊ नये याकरिता हीं आणखी मोहीम राबवून कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.
विलास पाटील
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा,




Post a Comment
0 Comments