निमगाव येथून अवैध दारु वाहतूक करनाऱ्यावर कारवाई 1आरोपी अटक व मोटर सायकल जप्त.
बिट जमदार गजानन इंगळे व पो.हे.का.संजय वराडे यांची दमदार कारवाई
नांदुरा..निमगाव...सोपान पाटील (उपसंपादक)मो. 7028259008
पोलीस स्टेशन नांदुरा येथील पो हे का गजानन इंगळे ब न 1180 व पो हे का. संजय वराडे बन 1984 यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी आरोपी नामे प्रमोद रामभाऊ इंगळे वय 40 वर्ष रा निमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा याचे ताब्यातून एक Honda Activa कंपनीची मोसा क्रमांक MH28 AX-0828 किमती अंदाजे 40,000/-रुपये व व एक पांढऱ्या रंगाची पोतडी ज्यामध्ये दोन खाकी रंगाचे पुठ्ठ्याचे बॉक्समध्ये देशी दारू बॉबी संत्रा कंपनीच्या 90 ml च्या कंपनी सीलबंद प्रति नग 40/- रुपये प्रमाणे एकूण 200 नग प्लास्टिकची शीशा किमती अंदाजे 8000 रुपये व पांढरी पोतडी किमती अंदाजे 20/- रुपये असा एकूण 48, 020 /-रुपये चा मुद्देमालाची वाहतूक करताना मिळून आल्याने नमूद आरोपीवर कलम 65 इ मदाका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments