ग्रामपंचायत सदस्यावर माती नेल्याचा व धमकीचा आरोप!
संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे 28 ऑगस्ट रोजी
ग्रामपंचायत सदस्य संतोष इगोकार यांच्यावर ग्रामस्थाने गंभीर आरोप केला आहे.
तक्रारदार संजय पांडुरंग हनवते (वय 48) यांनी तामगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तोंडी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या घरासमोर पावसाचे पाणी साचत असल्याने त्यांनी तेथे माती टाकली होती.
मात्र ग्रामपंचायत सदस्य संतोष इगोकार यांनी "तुमची घरपट्टी बाकी आहे" या कारणावरून जेसीबीद्वारे ती माती उचलून नेल्याचा आरोप हनवते यांनी केला आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, "सर्वांच्याच घरपट्ट्या बाकी आहेत, मग माझीच माती का नेली?" असे विचारल्यावर इगोकार यांनी शिवीगाळ करून "तुला जीवाने संपवीन" अशी धमकी दिली.
या प्रकरणी हनवते यांनी तामगाव पोलिसांकडे कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांनी तोंडी रिपोर्ट नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
ग्रामपंचायत सदस्याकडून नागरिकाला दिलेल्या धमकीमुळे गावात मोठी चर्चा सुरू झाली असून तामगावं पोलीस प्रशासनाकडून निष्पक्ष कारवाईची मागणी होत आहे.


Post a Comment
0 Comments