Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी आशिष राजपाल वानखडे यांची निवड

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी आशिष राजपाल वानखडे यांची निवड


अकोला(प्रतिनिधी):- *राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या अकोला जिल्हा अध्यक्षपदी रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील उमदे नेतृत्व आशिष वानखडे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे*

यांनी जाहीर केली.

    👉🏻राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात जोमाने संपूर्ण महाराष्ट्रात घोडदौड करीत आहे, राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज अनेक मान्यवर, जेष्ठ नेते, तसेच कार्यकर्ते, महिला, युवक, युवती ,विविध क्षेत्रातील मान्यवर पक्षात दाखल होत आहे.

काही स्वार्थी रिपब्लिकन पुढाऱ्यांनी आपले रिपब्लिकन गट प्रस्थापित पक्षाच्या वळचणीला नेऊन बांधले आहे तेव्हा सामाजिक प्रश्न असो अथवा अन्याय अत्याचाराचा विषय असो कुठल्याही प्रश्नावर ही नेतेमंडळी बोलत नाही.प्रस्थापित पक्षांना खुश करण्यासाठी निमूटपणे मूग गिळून बसले आहे.

प्रस्थापित पक्षांच्या हातचे बाहुले  बनलेल्या नेत्यांवर आता राज्यातील गोरगरीब घटकांचा विश्वास उडत चालला आहे.

     राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मात्र कुठल्याही प्रस्थापित पक्षाच्या दारात कटोरा घेऊन उभा नाही 

*छत्रपती शिवाजी महाराज –शाहू महाराज– महात्मा ज्योतिबा फुले–डॉ.बाबासाहेब आंबेडकर– व संतांची परंपरा घेऊन या राज्यात सर्व समाज घटकांना सोबत घेऊन परिवर्तन करायला निघाला आहे.*

वाट चुकलेले नंतर येतीलच परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने मात्र राज्यातील गोरगरीब दलित– बौद्ध– मुस्लिम अल्पसंख्यांक –ओ.बी.सी -भटके विमुक्त– आदिवासी वंचित समूहाला न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरला आहे.


आशिष वानखडे अकोला जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असून अकोला जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क सर्व समाज घटकांशी दांडगा आहे त्यामुळे संपूर्ण अकोला  जिल्ह्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष गतिमान होईल याचा विश्वास आहे. 

आशिष वानखडे यांच्या नियुक्ती मुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

*लवकरच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा अकोला जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष वानखडे यांनी सांगितले*

Post a Comment

0 Comments