Type Here to Get Search Results !

नांदुरा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार श्री जयवंत सातव सर यांची अवैध गुटखा व्यावसायिकांवर दबंग कार्यवाही.सातव साहेबांच्या या मोठ्या कार्यवाहीमुळे सर्वकडे कौतुकांचे वातावरण दिसुन रेत आहे.

 नांदुरा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार श्री जयवंत सातव सर यांची अवैध गुटखा व्यावसायिकांवर दबंग कार्यवाही.सातव साहेबांच्या या मोठ्या कार्यवाहीमुळे सर्वकडे कौतुकांचे वातावरण दिसुन रेत आहे.

नांदुरा पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरिक्षकांचा अवैध धंद्यावर धाड.

ठाण्यात दाखल होताच अवैध धंदेवाल्याच्या पायाखालची वाळू सरकली.


नांदुरा : सोपान पाटील .


मा. पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री लोढा साहेब खामगाव, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब यांचे अवैध गुटखा व्यावसायिकांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश आहेत त्यानुसार पोलीस स्टेशन नांदुराचे नवनियुक्त ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव यांनी पदभार स्वीकारताच अवैध व्यवसायिकांना विरुद्ध धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे याच दरम्यान दिनांक 28/06/2025 रोजी दुपारच्या वेळी मिळाल्या गुप्त खबऱ्याद्वारे नांदुरा शहरातील जळगाव जामोद रोडवरील पूर्णाई नगर या भागामध्ये एका टीन पत्र्याचे गोडाऊन मध्ये बोलेरो पिकअप वाहनसह गुटखा साठवून ठेवल्याची खात्रीलायक माहिती मिळाली वरून नांदुरा पोलिसांनी सदर गोडाऊन हे दोन शासकीय पंचासह व नांदुरा शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह पाहणी केली असता सदर गोडाऊन मध्ये

लावण्यात आलेले बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH48AY3421 मध्ये व गोडाऊनचे आतील एका टीन पत्र्याची खोलीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपकारक असलेला सुगंधित गुटखा एकूण किमती 12,26,277/- रु चा तसेच सदर गुटखा वाहतुक व वितरणा करिता वापरात येणारे एक पांढ-या रंगाचे महींद्रा बुलेरो पिकअप वाहन क्रं. MH48AY3421 किमंती 8,00,000/-रु असा एकुण 20,26,277/-रु चा मुददेमाल घटनास्थळावर शासकीय पंचा समक्ष मिळून आल्याने कायदेशीर कारवाई करून पंचा समक्ष जप्त करण्यात आला आहे, सदर गोडाऊनच जागा मालक विशाल विनोद जैन व बोलेरो पिकप चा चालक-मालक यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामधे अधिक आरोपी निष्पन्न करणे करीता तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सदर गुटखा रेड कारवाई ही पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पथकातील पीएसआय दीपक सोळंके एस आय मिलिंद जंवजाळ, कैलास सुरडकर, विनायक मानकर, राहुल ससाने, विनोद भोजने, पंकज वावगे, रवी सावळे, सुनील सपकाळ, यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments