माना येथे मद्य प्रेमींवर धाड. दहा जणांना अटक. " माझा पती माझा परमेश्वर " असे म्हणणाऱ्या सती सावित्रींचापरमेश्वराला वाचविण्याकरता पोलीस स्टेशनची धाव
माना/प्रतिनिधि..आशिष वानखडे
मेरा पति मेरा परमेश्वर " असे म्हणणाऱ्या सती सावित्रीचा माना पोलीस स्टेशनला आपल्या परमेश्वराला वाचविण्याकरिता धाव घेतली असून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन असभ्य वर्तन करताना माना येथील दहा मद्य प्रेमींना माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज
सुरोशे, व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 तारखेच्या रात्री नऊ वाजताच्या दरम्यान बाजाराच्या दिवशी मध्य धुंद अवस्थेत बाजारात व ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी असभ्य दारू पिऊन वर्तन करताना अजय निरंजन कोकणे वय 27 वर्ष, गजानन समाधान बावणे वय 40 वर्ष, नरेंद्र समाधान चक्रे वय 32 वर्ष, अजय गजानन आठवले वय 25 वर्ष, रवींद्र उत्तम वानखडे वय 49 वर्ष, अंकुश विनायकराव टाक वय 37 वर्ष, विनोद तुकाराम इंगळे वय 38 वर्ष, चांद खा महबूब खा वय पन्नास वर्ष, मंगेश सुधाकर गवई वय 38 वर्ष, अविनाश विठ्ठलराव कोकणे वय 30 वर्ष, सर्व राहणार माना हे मध्य प्रेमी बाजार लाईनच्या सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन असभ्य वागणूक करताना पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी या सर्व दहा जणांना अटक केली असून मात्र" मेरा पति मेरा देवता है " असे म्हणणाऱ्या सावित्रींचे माना पोलीस स्टेशनला धाव घेतली असून पोलीस स्टेशन मध्ये आपल्या पतीला त्यांनी खरपूस समज दिली. व मध्य धुंद परमेश्वराने आता मी कधीही दारू पिणार नाही. असे परमेश्वराकडून आश्वासन घेतले.
यावेळी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरवसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, बीट जमदार इंगळे, उमेश हरमकर, व इतर पोलीस कर्मचारी यांनी सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्या आरोपींवर ११०/११७ मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई करून समज देऊन आरोपींना सोडून देण्यात आले. यामुळे माना परिसरात मध्य धुंद प्रेमींवर पोलिसांचा वचक बसला आहे.



Post a Comment
0 Comments