अपहरण जालना जिल्ह्यात, प्रेत बुलढाणा जिल्ह्यात आढळला
गुलशेर शेख दि. २९ जून
किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तढेगाव शिवारात अनोळखी इसमाचा मृत्यदेह आज पहाटे सहा वाजता आढळून आला. यावरून किनगाव राजा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून ओळख पटविण्याचे कार्य सुरू असतानाच जालना जिल्ह्यातील राजाटाकळी येथे दिनांक २८ जून रोजी अपहरण झालेल्या घटनेची माहिती समोर आली. यावरून मृतकाची ओळख पटली आहे. हि घटना आज सकाळी उघडकीस आली.
दरम्यान अपहरण झालेल्या व मृतदेह आढळुन आलेल्या इसमाचे नाव सुरेश तुकाराम आर्दड आहे. याचा आज सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तढेगाव - टाकरखेड वायाळ रोडवर शेतात मृतदेह आढळून आला. तढेगाव येथील पोलिस पाटील गजानन फुके यांनी किनगाव राजा पोलिसांना फिर्याद दिली यावरून किनगाव राजा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद घेतली.
तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथून शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूल आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवून सुरेश तुकाराम आर्दड या तरुणाचे चार जणांनी चारचाकी वाहनामध्ये कोंबून अपहरण करण्यात आले होते. आज रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सुरेश अर्दड यांचे चुलत भाऊ सुभाष आर्दड यांच्या फिर्यादीवरून हरी कल्याण तौर, सखाराम उर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड (रा. राजाटाकळी), मिनाज बाबामिया सय्यद (रा. कु.पिंपळगाव) आणि चारचाकी वाहनाचा चालक या चार जणांविरुद्ध अपहरण आणि शास्त्रबंदी कायद्यानुसार जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती आहे.



Post a Comment
0 Comments