आज दिनांक 09/06/2025 रोजी नांदुरा पोलिसा तर्फे अवैद्य दारू विरुद्ध करण्यात आलेली कारवाई माहिती खालील प्रमाणे....
1. हॉटेल लक्ष कोलासर फाटा एन एच 53 हायवे येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे नरेंद्र जनार्दन धुरंदर व 31 वर्ष राहणार दहिवडी तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच कंपनी सीलबंद 90 एम एल च्या 21 नग शीशा किमती 745 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच
2. खैवाडी नांदुरा तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सुनील रामभाऊ नितोने वय 35 वर्ष राहणार खैरवाडी वार्ड क्रमांक 16 नांदुरा याचे विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या 90 एम एल च्या 10 नग शिशा किमती 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच
3. जनता चौक नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे मोहन गजानन हिरळकर राहणार कोलासर तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याची ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच कंपनी सीलबंद 90 एम एल च्या 21 नग प्लास्टिक शिशा किमती 730 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमूद आरोपीतांविरुद महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे पोलीस स्टेशन नांदुरा येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आज रोजी 03 दारूबंदी कारवाई मुद्देमाल 1830/-रुपयाचा जप्त करण्यात आला आहे..
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सहायक फौजदार मिलिंद जवंजाळ, पोहेका मोईद्दीन सय्यद,पोहे का प्रमोद चिखलकर, पोहे का राहुल ससाने, पो का विनायक मानकर, सुनील सपकाळ, योगेश निंबाळकर, विनोद भोजने, रवींद्र झगडे,धनंजय वेरूळकर यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments