पंचगव्हाण/अकोला प्रतिनिधी
आशिष वानखडे
तेल्हार तहसील अंतर्गत येत असलेल्या उबारखेड पंचगव्हाण येथील शेतकऱ्यांनी पांदन शेत रस्ता मोकळा करून देण्यात यावा असे निवेदन दी 22/5/2025 रोजी तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.परंतू आज पर्यंत काहीच कार्यवाही करण्यात आली नाही.उबारखेड पंचगव्हाण येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी उबारखेड ते भांबेरी हा पांदन शेत रस्ता आहे परंतु या शेत रस्त्यावर संपूर्ण उबारखेड गावाचे सांडपाणी वाहत आहे.पांदन शेत रस्त्याला लागून असलेले शेतकरी श्रीकृष्ण डेरे आणी आदीत्य अग्रवाल हे दोन्ही शेतकरी सांडपाणी वाहून जाण्यासाठी.शेत रस्त्याच्या बाजुला नाली काढु देत नसल्या मुळे गावातील सर्वच सांडपाणी हे रस्त्यावर साचले आहे.त्यामुळेच उबारखेड खेलदेशपांडे येथील सर्व शेतकऱ्यांना शेती वहीतीस अडचण निर्माण होत आहे.शेतकऱ्यांना आपली शेती पडीत राहते का अशी भिती वाटत आहे नाली काढून दिल्यास समस्या मिटणार आहे परंतु हेकेखोर शेतकरी नाली.काढण्यास मनाई करत.आहेत तरी शासकीय नियमानुसार रस्त्याची मोजणी करून पूर्ण रस्त्या आम्हास मोकळा करून देण्यात यावा असे निवेदन तेल्हारा तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी निवेदनावर श्रीकृष्ण अग्रवाल,मंगेश गवारगुरू,सतीश कोगदे,पूरोशोतम जशनपुरे,शुभाष अग्रवाल,अनिल असलमोल,ईत्यादी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment
0 Comments