आझाद पठाण – युवा जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी, बुलढाणा जिल्हा
मलकापूरमध्ये अल्पसंख्याकावर रॉडने अमानुष हल्ला – आरोपी मोकाट, पोलिस प्रशासन गप्प!
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे ६ जून २०२५ रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय प्रकार घडला आहे. ५५ वर्षीय अल्पसंख्याक व्यक्तीवर फिल्मी स्टाईलने लोखंडी रॉडने जबरदस्त हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर खोल जखम झाली असून तब्बल १८ टाके पडले आहेत. तसेच हात-पायांवर देखील अमानुष मारहाण करण्यात आली आहे.
घटनेला पाच दिवस उलटूनही एकही आरोपी अटकेत नाही. का? कारण आरोपी हे पैशाने बलाढ्य आहेत, राजकीय पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे आणि सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे ते बहुसंख्य समाजाचे आहेत!
दुसरीकडे, पीडित व्यक्ती अल्पसंख्याक समाजातील असल्यामुळे पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. FIR नोंद झाल्यानंतरही कारवाईचा शून्य गतीने सुरू असलेला तपास हा पोलिसांच्या पक्षपाती आणि भेदभावाच्या वृत्तीचा जिवंत पुरावा आहे.
कायदा बहुसंख्यांसाठी वेगळा आणि अल्पसंख्याकांसाठी वेगळा का?
आम्ही समाजवादी पार्टीतर्फे हा स्पष्ट सवाल विचारतो की,
👉 "कायदा हा सगळ्यांसाठी समान असावा ही लोकशाहीची मुलभूत संकल्पना आहे. मग आज ती कुठे गेली?"
👉 "जर आरोपी बलाढ्य असतील, तर काय पोलिसांना ते दिसत नाहीत का?"
👉 "जर पीडित अल्पसंख्याक असेल, तर त्याचा आवाज नेहमीच दाबला जाणार का?"
आमच्या स्पष्ट मागण्या:
1. सर्व आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे.
2. पोलिसांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
3. या घटनेची दखल राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ घ्यावी.
4. जर प्रशासनाने दुर्लक्ष केले, तर आंदोलन अटळ!
ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही, ही लोकशाही, सामाजिक समता आणि अल्पसंख्याकांच्या अस्तित्वावर झालेली थेट कुरघोडी आहे. आम्ही आवाज उठवत राहू आणि गरज पडल्यास रस्त्यावरही उतरणार!
✊ न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही — हीच समाजवादी पक्षाची भूमिका आहे!
– आझाद पठाण
युवा जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी – बुलढाणा जिल्हा

Post a Comment
0 Comments