Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे नांदुरा पोलिसांचा नारखेड शिवारातील मोहा दारू चालू भट्टीवर छापा

 नांदुरा -सोपान पाटील.




नांदुरा पोलिसांचा नारखेड शेत शिवारातील मोहा दारू चालू भट्टीवर  छापा 

आज दिनांक 08/06/2025 रोजी  मिळालेला गुप्त खबरे वरून नारखेड तालुका नांदुरा शिवारातील ई क्लासचे जागेतील नाला भागामध्ये आरोपी नामे संतोष भोनाजी डाबेराव वय 42 वर्ष राहणार नारखेड तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा, याचे विरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून 1.दोन 20 लिटर क्षमतेच्या टिन पत्राच्या डब्यामध्ये 40 लिटर गुळ मिश्रित सडवा 4000/-रुपये 

2. एका पंधरा लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅन मध्ये 12 लिटर हातभट्टीची दारू किमती 1200 रुपये 3. टीन पत्राच्या डब्यामध्ये तीस लिटर  मोह सडवा 3000/-रुपये व इतर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे साहित्य किमती 300 रुपये असा एकूण 8590/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (क)(फ)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोहे का गजानन इंगळे, पोहे का संजय वराडे यांनी केली आहे. .

Post a Comment

0 Comments