निर्दयतेने कत्तलीच्या उद्देशाने कोंबलेल्या 16 गोवंशांची पोलिसांकडून सुटका..
मलकापूर: सोपान पाटील
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील पारपेट भागात अतिशय निर्दयतेने कत्तलीच्या उद्देशाने 16 गोवंश कोंबून ठेवले असल्याचे सूत्रांकडून पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांकडून सदर ठिकाणी छापा टाकण्यात येऊन सदर जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर असे की, दिनांक 05 जून 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता गोपनीय अंमलदार व डी बी पथकाकडून शहरातील मुस्लिम बहुल वस्तीतील हाशमी नगर परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की एका टीनाच्या बंदिस्त रूममध्ये दहा ते पंधरा गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बंदिस्त करून ठेवले आहे. या गोपनीय माहितीची खात्री करणे कामी पोलीस निरीक्षक गणेश गिरी,सहाय्यक पोलीस निरीक्षक करुणाशील तायडे, पंचासह हजर होऊन सरकारी कॅमेरे व ड्रोन च्या सहाय्याने सदर टीनाच्या रूम मधील बंदिस्त 14 गोरे,एक गाय व एक वासरू असल्याचे पोलिसांना आढळून आले.सदर गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून प्रथम पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणीनंतर सदर गोवंश जातीच्या जनावरांना बेलाड येथील गौरक्षण मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
*मकोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार?*
आमदार संग्राप जगताप यांनी गोवंश हत्या या घटना गंभीर असून, यावर शासनाने उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी विधानसभेत केली होती. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गोवंश हत्या संदर्भात वारंवार ज्यांच्यावर असे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कडक कारवाई केली जाईल. तसेच मकोका अंतर्गत कारवाईला मंजुरी देण्यात येईल. गुन्हेगाराला सोडणार नाही". तेव्हा सदर प्रकरणात आरोपींवर काय कारवाई होणार हा प्रश्न नागरिकात मध्ये चर्चा धरून आहे.

Post a Comment
0 Comments