बच्चुभाऊ कडु यांचे अन्नत्याग आंदोलनावर सरकारने त्वरित निर्णय द्यावा .
प्रहार चे संस्थापक अध्यक्ष वंदनिय बच्चुभाऊ कडु यांचे गुरूकुंज मोझरी,येथे ८ जुन पासुन बेमुदत अन्न त्याग आंदोलन चालु केले आहे आज सहा दिवस झाले तरी शासनाने बच्चुभाऊ यांच्या आंदोलनाची दखल घेतली नसुन, बच्चुभाऊ कडु यांची तब्बेत खालावत चालली असुन तरी देखील प्रशासन सुस्त आहे ,ही शोकांतिका आहे, वंदनिय बच्चुभाऊ कडु हे नेहमी दिव्यांग ,विधवा अनाथ ,शेतकरी यांचे करिता अविरत याचे प्रश्न अडचणी सोडवित असतात,आता बच्चुभाऊ यांनी दिव्यांग शेतकरी,विधवा महिला सह सर्व सामान्य लोकांन साठी आंदोलन चालु केले या मध्ये एकुण सतरा मागणी ची अमंलबजावणी करावी याकरिता अन्न त्याग आंदोलन करित आहेत
यामधील मुख्य मागणी, दिव्यांगांना सहा हजार पेंशन , शेतकरी यांची कर्ज माफी, शेतकरी यांचे पेरणी ते कापणी पर्यंत सर्व खर्च मुजरी रोजगार हमीं योजनेतुन करावी यासह विविध मागणी शासनाकडे केली आहे याकरिता कार्यालय येथे दिव्यांग प्रहार सेवक तथा सामाजिक कार्यकर्ते शेखर साबळे यांचे प्रमुख नेतृत्वात दिव्यांग बांधवांनी ठिया आंदोलन करू सागर पुडकर , अतुल कळसकर सह तालुकाव सावरा व आंबेगाव बाजार मधील दिव्यांग मोठया संख्येने उपस्थित होते

Post a Comment
0 Comments