Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या दारु विक्रेत्यांवर व जुगारावर धडाकेबाज कारवाई केली

 देवेंद्र जयस्वाल... नांदुरा 

 दिनांक 03/06/2025 व  दिनांक 04/06/2025 रोजी नांदुरा पोलीस स्टेशन तर्फे  जुगार कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे....

जुगार कायद्यांतर्गत कारवाई......

1. दिनांक 03/06/2025 रोजी मिहानी चौक नांदुरा येथे सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सुभाष सुपडा इंगळे वय 46 वर्ष राहणार गांधी चौक नांदुरा तालुका नांदुरा याच्या विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 510 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच 

2. दिनांक 04/06/2025 रोजी बँक ऑफ इंडिया समोर सार्वजनिक ठिकाणी नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे गणेश सदाशिव वेरूळकर वय 42 वर्ष राहणार नांदुरा खुर्द वार्ड क्रमांक 20 याच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वय कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 775 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच 

3. दिनांक 04/06/2025 रोजी मिळालेल्या माहितीवरून गुजरी चौक चांदुर बिसवा येथे आरोपी नामे उदयभान नथू सुषिर वय 55 वर्ष राहणार चांदुर बिस्वा तालुका नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 615 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच 

4. दिनांक 04/06/2025 रोजी ग्राम पातोंडा तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपीं नामे किरण वसंत तेलंग वय 37 वर्ष राहणार पातोंडा तालुका नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व  जुगार साहित्य एकूण किमती  485 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे 

5. दिनांक 04/06/2025 रोजी गुजरी चौक चांदुर बिस्वा तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे प्रलाद उत्तम कठाडे वय 35 वर्ष राहणार वार्ड क्रमांक पाच चांदुर बिस्वा तालुका नांदुरा याच्या विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून जुगाराची नगदी व साहित्य एकूण किमती 465 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमूद आरोपीतांविरुद्ध 12अ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

एकूण 05 कारवाई 3050 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे......

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे स फौजदार मिलिंद जवंजाळ, पोहे का मोहदिन सय्यद, पोहे का अमोल खोंदील, पो का विनोद भोजने, विनायक मानकर, रवींद्र झगडे, संदीप ढोले, यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments