उप संपादक .आशिष वानखडे
आडगाव/अकोट.
.. गावालगतच्या शिवाजी नगर शेत शिवारातील शेतात बांधलेल्या गोठ्यावर काल रात्री जंगली जनावरांनी अचानक केलेल्या हल्ल्यात पाच जनावरांचा मृत्यू.....गावा लगतच असलेल्या शिवाजी नगर शेत शिवारात विजय रघुनाथ निमकर्डे व रवी रघुनाथ निमकर्डे यांच्या गुरांच्या गोठ्यात गाई, वासरे व बकर्या बांधलेल्या असताना रात्री गोठ्यातील तीन बकर्या व दोन वासरांवर जंगली जनावरांनी हल्ला करुन ठार केले आहे यात तीन बकर्यां अक्षरशः फाडून खाल्लेल्या अवस्थेत दिसून येत आहेत तर दोन वासरांना जखमी अवस्थेत मारुन टाकले आहे ..आज सकाळी निमकर्डे बंधूंच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांना धक्काच बसला त्यांनी ताबडतोब घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाला दिली यावर वनविभागाचे वनरक्षक अतिफ हुसेन यांनी घटनास्थळी भेट देवून तपासणी करून माहिती घेतल्यानंतर बकर्यां आणि वासरांवर झालेला हल्ला हा जंगली जनावराचा नसून तो कुत्र्यांनी केलेला असल्याची बाब प्रदर्शित केली... यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ अबोली कथे यांनी हल्ल्यात मेलेल्या जनावरांचे पोस्टमार्टम केले .. गोठ्यातील जनावरांवर काल झालेला अचानक हल्ला व त्यात जनावरांचा मृत्यू होणे यामुळे गावात जगली जनावरांबाबत दहशत निर्माण झाली असून झालेला हल्ला हा कुत्र्यांनी केलेला नसून तो जंगली जनावरांचा च असल्याचे मत निमकर्डे बंधु व गावातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.. जंगली जनावरांनी केलेल्या हल्ल्यात आमच्या झालेल्या नुकसानीची वनविभागाने तत्परतेने कार्यवाही करुन भरपाई द्यावी अशी मागणी निमकर्डे बंधु यांनी ऑनलाईन तक्रारीतून वनविभागाकडे केली आहे


Post a Comment
0 Comments