Type Here to Get Search Results !

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे* 

नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.*

चांदवड शहरातील श्रीराम रोड रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचे काम व शिवाजी चौक रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर रोड, होळकर शाळा रोड या रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने दि. ३ जून २०२५, मंगळवार रोजी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.*


            चांदवड शहरातील श्रीराम रोड या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे. परंतु हे डांबरीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे. रस्त्यावरच्या डांबरातील खडी अगदी मोकळी दिसत आहे. हा रस्ता एक लेवल मध्ये तयार करण्यात आलेला नाही. या रस्त्याचे काम ओबडधोबड करण्यात आलेले आहे. रस्त्यावर डांबराचा फक्त एक लेअर टाकून रस्ता पूर्ण केला आहे. नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी नेमलेल्या ठेकेदारांनी या रस्त्याचे काम इन्स्ट्रुमेंट प्रमाणे केलेले नाही. रस्ता तयार करण्याच्या आधी व्यवस्थित खोदकाम करण्यात आलेले नाही व त्यामध्ये दगडाची टॅगिंग, सोलिंग व पिचिंग देखील करण्यात आलेली नाही. हा रस्ता तयार करण्याच्या आधी या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले होते, खड्ड्यांमध्ये हलक्या क्वॉलिटीच्या डांबराचा पातळ थर टाकून लोकांची दिशाभूल करत हा रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रोड बनवण्यासाठी अतिशय खराब क्वॉलिटीचे डांबर वापरण्यात आलेले आहे. हा रस्ता एकाच दिवसात तयार करण्यात आलेला आहे. या रस्त्याच्या मधोमध अंडरग्राउंड गटारींचे चेंबर आहेत. या चेंबरवर ढापे टाकण्यात आलेले आहेत व या ढाप्यांमुळे देखील अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. नगरपरिषद मुख्याधिकारी, इंजीनियर व त्यांच्या संगनमताच्या ठेकेदारांचे या रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेला सर्व शासकीय निधी लाटण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामाला किती निधी मंजूर करण्यात आला होता व यापैकी किती निधी खर्च करण्यात आला, ही माहिती शहरात ठिकठिकाणी जाहीर फलक लावत जनतेला तपशीलवार कळविण्यात यावी.

          चांदवड शहरात विकासकामांच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शासकीय निधी लाटण्याचे काम सुरू केलेले आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे. या रस्त्याचे काम जास्त दिवस टिकणार नाही. या रस्त्याचे काम अतिशय बोगस पद्धतीचे करण्यात आले आहे. ज्या कोणी ठेकेदाराने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे कंत्राट घेतले होते, शासनाने त्या ठेकेदाराकडून "हा रस्ता किती दिवस टिकेल?", याचे हमीपत्र लिहून घ्यावे. चांदवड शहरात रस्त्यांचे असे ओबडधोबड काम करणाऱ्या ठेकेदारांचे लायसन्स रद्द करत त्यांचे नाव ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे. या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी व शासनाने या ठेकेदारांना महाराष्ट्रात कुठेही काम देऊ नये.

             शहरातील शिवाजी चौक रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर रोड, होळकर शाळा रोड या रस्त्यांचे सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे या रस्त्याच्या कामाला दिरंगाई होत आहे व या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे यामुळे जनतेला या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. निधीची टक्केवारी लाटण्यासाठी रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. या रस्त्यावर खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी, पायी चालणारे लोक, दुचाकी व चारचाकी वाहनांची रहदारी असते. नगरपरिषदेने शहरातील रस्ते बनवण्याचे कंत्राट अनेक कंत्राटदारांना दिलेले आहे. पण या कंत्राटदारांपैकी एकही कंत्राटदार रस्त्याचे काम व्यवस्थितपणे करत नाहीये. या कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शासनाच्या निधीचा भ्रष्टाचार चालू आहे. सदर रस्ता हा जूना असून या रस्त्यावर कार्पेट टाकता डायरेक्ट सीलकोट टाकण्यात आलेला आहे, हे बेकायदेशीर आहे. या रस्त्यांच्या कामाची क्वॉलिटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्यात यावी व सर्व रिपोर्ट घेण्यात यावे. तसेच, या रस्त्यांची गुणवत्ता चाचणी करण्यात यावी. रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे कामे करणाऱ्या ठेकेदारांना यापुढे रस्त्याच्या कामांचे कॉन्ट्रॅक्ट व बिल देण्यात येऊ नये. तसेच, या ठेकेदारांचे डिपॉझिट शासनाने जमा करून घ्यावे व त्यांना डिपॉझिट परत देऊ नये.

          मागील दहा ते पंधरा वर्षांपासून श्रीराम रोड, शिवाजी चौक रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर रोड, होळकर शाळा रोड तयार करण्यात आलेले नाहीत. अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. नगरपरिषद मुख्याधिकारी, इंजीनियर व ठेकेदार जनतेला न जुमानता दादागिरी व दडपशाही करत रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत. हे शहरातील मुख्य रस्ते असल्याने येथे अतिशय वर्दळ असते व सर्व महापुरुषांच्या मिरवणुकीचे रथ या रस्त्यांवरूनच जातात. तसेच शहरातील शाही मस्जिद रोड, उर्दू शाळा रोड, लेंडीहट्टी रोड, बुखारी बाबा रोड या रस्त्यांची कामे देखील निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली आहेत. रस्त्यांचे कामे निकृष्ट दर्जाचे करत असल्याने जनतेमध्ये संतप्ततेचे व तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.  

      ‌ चांदवड शहरात लवकरात - लवकर नवीन व चांगल्या क्वॉलिटीचे रस्ते बांधण्यात यावेत. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने नगरपरिषदेसमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल. यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस आपण सर्वस्वी जबाबदार रहाल, याची नोंद प्रशासनाने घ्यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला व प्रत माहितीसाठी मुख्यमंत्री, चांदवड - देवळा मतदारसंघ आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरिक्षक त्यांना देण्यात आले.

       यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments