नांदुरा प्रतिनिधी..
मा. तहसीलदार साहेब नांदुरा
ता नांदुरा जि. बुलढाणा.
विषयः नांदुरा तालुक्यामधील बरेच तलाठी आपल्या हलक्यावर न रहाता नांदुरा येथे आपले कार्यालय बनविले आहे. त्यांनी आपल्या हलक्यावर मुख्यालयी जाऊन काम करणे बाबत.
महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनती करण्यात येते की, आपले नांदुरा तालुक्या मधील बरेच तलाठी हे आपल्या हलका किवा मुख्यालय येथे न जाता नांदुरा येथे आपले काम करीत असतात, त्याच्या कामाविषयी कुठलीही तक्रार नाही.
परंतु शासनाने फक्त तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी निर्माण केले आहे व मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय हे हलक्या प्रमाण रचना करून दिलेली आहे. तसेच त्या हलक्यामध्ये नवीन कार्यालय बांधकाम करून दिलेले आहे. काही ठिकाणी नसेल पण बऱ्या पैकी काम पूर्ण झालेले आहे. याच्या मागचा शासनाचा उद्देश आहे कि शेतकरी यांना सेवा देणे त्याची कामे त्याच्या राहत्या ठिकाणाच्या गावाच्या जवळ व्हावी त्याना जास्त वेळ लागणार नाही परंतु आपल्या तालुक्या मधील बरेच तलाठी आपल्या हलका किवा कार्यालय येथे न हजार न राहता नांदुरा या ठिकाणी त्यांनी आपले कार्यालय थाटले आहे.
त्यामुळे सर्व गावोगाच्या शेतकऱ्याना नाहक त्रास होती साधा ७/१२ जरी त्याना प्यायचा म्हटला तरी त्याना तालुक्याच्या ठिकाणी जाव लागत आहे. आता शेतकऱ्याची पिक कर्ज घेण्यासाठी लगबग सुरु असून त्यासाठी त्याना ७/१२.८ अ ची आवश्यकता आहे. त्याना हि कागदपत्रे त्याना सहज मिळावी त्यासाठी आपले तलाठी मुख्यालयी असणे गरजेचे आहे, आणिहाच शासनाचा उद्देश आहे. असे मला वाटते तो सफल व्हावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर आपण आपल्या अंतर्गत असणारे जे तलाठी मुख्यालयी हजर राहत नाही, त्या तालाठ्याना
आपल्या स्थारावरून आदेश देणे गरजेचे आहे.
अन्यथा सर्व शेतकरी मिळून लोकशाहीच्या मागनि आंदोलन करतील त्या आंदोलनाची सर्व जवाबदारी तहसीलदार म्हणून आपली असेल.


Post a Comment
0 Comments