माना/अकोला
आशिष वानखडे
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार अनेक दिवसांपासून माना गावात गल्लोगल्ली अवैध देशी दारू विक्री महिला व पुरुष करीत आहेत. नावापुरते दुकानात चॉकलेट, बिस्कीट ठेवून या धंद्या मागे अवैद्य देशी दारू क्षमतेपेक्षा जास्त भावाने विक्री करतात. अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असताना अधिकाऱ्यांना याचे भनकही न लागता हा अवैद्य व्यवसायाचा कारभार कर्मचारी पाहत असल्याची गावात चर्चा सुरू आहे. काल दिनांक पाच जून रोजी येथील ठाणेदारांना गुप्त माहितीवरून मेन बाजार लाईन मध्ये एका झोपडीत अवैद्य दारू विकताना दोघेजण रंगेहात पकडले. त्या आरोपीत रवी हिम्मत वाघमारे, वय 35 वर्ष, राहणार माना. व उमेश गोंडाने, राहणार माना, यांच्याकडून एक हजार रुपये किमतीची देशी दारू, व दारू विकून मिळवलेले सात हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. ऑपरेशन प्रहारच्या नामकरणाखाली ही धाड टाकण्यात आली होती. हेच ऑपरेशन प्रहार गल्ली बोलीत सुरू असलेल्या अवैद्य दारू विक्रेत्यांच्या धंद्यावर प्रहार करेल काय? अशी गावात चर्चा सुरू असून आता मात्र गल्ली बोलीत धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून आरोपींवर 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत कारवाई केली आहे.

Post a Comment
0 Comments