Type Here to Get Search Results !

मलकापूर नगरपरिषद चे मुख्यअधिकारी व नगर अभियंता यांनी केलेल्या हरकतीची सखोल चौकशी करण्याकरिता जिल्हाधिकारी साहेबांना उपविभागीय दंडाधिकारी साहेब मलकापूर यांच्यामार्फत उज्वल मानवता संस्था तर्फे निवेदन देण्यात आले.

 मलकापूर प्रतिनिधी...

मलकापूर नगरपरिषद चे मुख्याधिकारी व नगर अभियंता यांनी केलेल्या हरकतीची सखोल चौकशी करण्याकरिता जिल्हाधिकारी साहेबांना उपविभागीय दंड अधिकारी साहेब मलकापूर याच्या मार्फत उजवल मानवता संस्था तर्फे देण्यात आला निवेदन...*


आज दिनांक 04 जून 2025 बुधवार रोजी उज्वल मनता संस्था बुलढाणा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रेहान शेख यांचे तर्फे उपविभागीय दंड अधिकारी साहेब मलकापूर यांच्या मार्फत मा.जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना निवेदन देण्यात आला या निवेदनात दिनांक 24 मे 2025 रोजी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष दानिश शेख यांनी मलकापूर नगरपरिषद मध्ये मलकापूर नगरपरिषद चे मुख्याधिकारी व नगर अभियंता ठोंबरे यांनी केलेल्या हरकतीबद्दल व वारंवार मुस्लिम बस त्यांना डावलण्याचे प्रयत्न्याचे विरोधात सांडपाणी आणून टाकल्याबद्दल त्यांचे विरोधात उपमुख्याधिकारी भुसारी तथा नगर अभियंता ठोंबरे व बयेस पाणीपुरवठा अभियंता यानी माननीय प्रशासक साहेब याना उलट सांगुन व खोटी माहिती देऊन पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केलेली आहे. व दिनांक 26 मे 2025 रोजी नगर परिषदेतील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी काम बंद आंदोलन करून यांनी अटकेची मागणी केलेली आहे. सदर 31 जानेवारी 2025 पासून बुलढाणा जिल्हाध्यक्ष दानिश शेख हे वारंवार फोनवर,प्रत्यक्ष भेटून व रमजान ईद च्या अगोदर उपमुख्याधिकारी भुसारी व प्रशासक राहुल तायडे साहेब यांनी स्वतः नगर अभियंता ठोंबरे यांना लकी लॉन यान किराणा समोरील तुटलेल्या नाली वरील ढापे करण्याचे सांगितले होते.त्या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी,मदर्सेतील विद्यार्थी व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, लग्न सोहळ्यातील लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो 3 वेळा जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तरीही काम न सुरू झाल्याबद्दल नागरिकामध्ये रोष निर्माण होत असल्यामुळे बुलढाणा जिल्हाध्यक्ष दानिश शेख यांना टोकाची भूमिका घेतली होती. मागील चार महिन्यांपासून एका नाली वरचे ढापे करण्यासाठी नगरपालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहेत फक्त याच्यासाठी त्या ठिकाणी राहणारे लोक मुस्लिम आहेत आणि मागणी करणारी एक मुस्लिम समाजाचा पक्ष आहे. अशी मानसिकता असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून हे काम केलेले आहेत. प्रसार माध्यमांशी बोलताना नगर अभियंता यांनी सांगितलेला आहेत व त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत सांगितलेला आहेत. बांधकाम विभागात कोणी अधिकारी कर्मचारी हजर नसताना त्यांनी आंदोलन केले व नंतर त्याच तक्रारी त्यांनी प्रसार माध्यमे विषयी बोलताना सांगितलेले आहेत की तेथील महिला कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केलेली आहेत सदर संपूर्ण तक्रार ही बनावटी आहेत. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत त्याची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी कर्तृत्वात कसूर निघाल्यास उपमुख्याधिकारी,बांधकाम अभियंता, पाणीपुरवठा अभियंता यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे.

नगरपरिषद मध्ये पहिल्यांदाच आंदोलन झालेले नसून या अगोदर सुद्धा अर्ध नग्न आंदोलन झाले त्यावेळेस नगरपालिका प्रशासन झोपले होते का तसेच उपमुख्य अधिकारी यांच्या वाहनांवर रिझल्ट टाकण्यात आले तसेच इतर आंदोलने करण्यात आली परंतु आंदोलन करते हे हिंदू समाजाचे होते आणि तक्रारदार सुद्धा हे पण हिंदू समाजाचे होते म्हणून त्यांच्याविरुद्ध नगरपालिके मार्फत राज रोजी पर्यंत कोणत्याच प्रकारची तक्रार देण्यात आलेली नाहीत ही तक्रार जातीवादक प्रवृत्तीचे असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी दानिश शेख हे मुस्लिम असून नेहमी मलकापूर शहरातील जिल्ह्यातील राज्यातील व देशातील मुस्लिम दलित समाजावर होणाऱ्या अत्याचार विरोधात तसेच मूलभूत सुविधांसाठी अत्यावश्यक सेविसाठी नेहमी आवाज उठवतात म्हणून त्यांना दडपण्याचा व त्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न कोणाच्या इशाऱ्यावर करण्यात येत आहेत अशी चर्चा मलकापूर शहरात आहेत तरी या प्रकरणाची माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी एक समिती नेमून उच्चस्तरीय त्याची चौकशी करण्यात यावी अन्यथा आमच्या पक्षातर्फे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल यावेळी उपस्थित जफर खान अफसर खान इरफान शेख पत्रकार शब्बीर शेख अय्युब बाबा.....

Post a Comment

0 Comments