Type Here to Get Search Results !

अंघोळ करतांना व्हिडिओ काढुन ब्लेकमेल ..विवाहीतेवर पाच महिन्यांपासून वारंवार अत्याचार, संग्रामपुर तालुक्यातील घटना.

संग्रामपुर ता. सोपान पाटील.


अंघोळ करतांना व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; विवाहितेवर पाच महिन्यापासून वारंवार अत्याचार, संग्रामपूर तालुक्यातील घटना!*

 तालुक्यातील एका विवाहित महिलेला अंघोळ करत असताना गुपचूप व्हिडिओ व फोटो काढून, त्याचा गैरफायदा घेत तिच्यावर पाच महिन्यांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संग्रामपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३ जून रोजी गुन्हा दाखल केला असून, तो सध्या फरार आहे. आरोपी नीलेश प्रल्हाद भवर (वय २४) याने २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पीडित महिला अंघोळ करत असताना तिचे अंगावरचे कपडे नसलेले फोटो आणि व्हिडिओ चोरून मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. या प्रकाराची कल्पना महिलेला लागताच आरोपी तेथून पळून गेला. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याने पीडितेच्या घरी जाऊन ते आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवत, ब्लॅकमेल करत शरीरसुखाची मागणी केली. नकार दिल्यास हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत सातत्याने मानसिक त्रास दिला. ७ जानेवारी रोजी आरोपीने पीडितेच्या घरी घुसून तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. त्यानंतर १३ जानेवारी रोजी शेतात एकटी असताना पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. अशाप्रकारे जवळपास सात ते आठ वेळा आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने अखेर २९ मे रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, त्यावरून ३ जून रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी फरार असून, पोलिस शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments