*माना पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध प्रहार ऑपरेशननीकसली कंबर. सलग तीन दिवस अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई. आज खापरवाडा येथे पोलिसांची धाड*
माना/मुर्तीजापुर
आशिष वानखडे
सतत तीन दिवस माना
पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कंबर कसली असून माना पोलीस मात्र आता ॲक्शन मोडवर आल्याचे नागरिकांना दिसत आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 5 जून रोजी माना येथील मेन लाईन बाजारात राजरोसपणे सुरू असलेली अवैद्य देशी दारू विकत असलेल्या दोन महाठकांना माना पोलिसांनी अटक करून कारवाई केली. तरीसुद्धा परिसरात अवैध धंदे हे सुरू होते हे पाहून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरवसे, व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून ठाणेदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना माहितीही न करता काल दिनांक 6 जून रोजी ज्या ठिकाणी अगोदर अवैध दारू पकडली होती. त्याच ठिकाणी राजरोसपणे अवैद्य दारू विक्रीचे काम सुरू होते. माना पोलीस स्टेशनचे 25 ते 30 होमगार्ड व पोलीस कर्मचारी हे मोक्यावर पोहोचून अवैद्य दारू विक्री करीत असलेला महाठघातीतून पळून गेला. व तेथील दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. व आज दिनांक 7 जून रोजी माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खापरवाडा येथील अवैद्य दारू विक्री करीत असलेला रोशन गवई, धीरज सावळे, व अवधूत बर्डे, यांच्यावर माना पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून 2660 रुपयाचा दारूच्या शील बंद बॉटलासह मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश डोंगरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जयकुमार मंडावरे,, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश हरमकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज वाघमारे, व महिला पोलीस कॉन्स्टेबल रोशनी गायकवाड यांनी ही कारवाई केली.
या कारवाईला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या प्रहार ऑपरेशनला अधिक बळ मिळत असून महिलात मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Post a Comment
0 Comments