Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या जुगार ,दारु विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली.ठाणेदार विलास पाटील यांच्या दबंग कारवायांमुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले

आज दिनांक 07/06/2025 रोजी नांदुरा पोलिसांतर्फे अवैध दारू व जुगार कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई माहिती खालील प्रमाणे.... 



दारूबंदी कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई*....

1. ग्राम दहिगाव तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सौरभ दुर्गादास नाहीसे वय 28 वर्ष रा दहिगाव तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90 ml च्या कंपनी सीलबंद 60 नग प्लास्टिक शिशा किमती 2120/-रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच 

2. खुमगाव बस स्थानक तालुका नांदुरा येथे मिळणाऱ्या माहितीवरून आरोपी नामे केशव रवींद्र काळे वय 25 वर्ष राहणार खुमगाव तालुका नांदुरा यांच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच कंपनी सीलबंद 90 एम एल च्या 26 नग शिशा किमती 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच 

3. दहिवडी फाटा तालुका नांदुरा येथे हॉटेल लक्ष समोर मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे क्रिश किसन वानखडे वय 19 वर्षे राहणार माऊली भोटा तालुका जळगाव जामोद याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90 एम एल च्या 42 नग प्लास्टिक शिशा किमती 1480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला 

4. ग्राम निमगाव तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून आरोपी नामे नामदेव लक्ष्मण चोपडे राहणार निमगाव तालुका नांदुरा याचे ताब्यातून 1.देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या 90 एम एल च्या एकूण 55 नग प्लास्टिक शिषा कंपनी सीलबंद किमती 1925 रुपयांचा मुद्देमाल, 2.रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 एम एल च्या 08 नग काचेच्या शीशा एकूण किमती 1520 रुपयांचा मुद्देमाल, 3.एम सी मेक डॉल नंबर वन कंपनीच्या दोन लिटरच्या 02 प्लास्टिकच्या शीशा किमती 3200 रुपयाचा मुद्देमाल असा ऐकून 6665 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच 

5. ग्राम निमगाव तालुका नांदुरा वाल्मीक पान सेंटर समोर सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे आशिष शंकर इंगळे वय 28 वर्ष राहणार निमगाव तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90 एम एल च्या 28 न प्लास्टिक सीलबंद शीशा किमती 1000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच

6. जुने बस स्थानक नांदुरा या ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे मुकुंदा शालिग्राम तायडे व 49 वर्षे राहणार माठोडा तालुका नांदुरा याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90 एम एल च्या 16 नग प्लास्टिक शि    शा किमती 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपीतांविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 आज रोजी दारूबंदी कायद्यांतर्गत एकूण 06 केसेस 12835 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे


जुगार कायदा कारवाई ...

1.ग्राम दहिगाव तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपींना मंगेश नारायण जवरे वय 40 वर्षे राहणार दहिगाव तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे  साहित्य एकूण किमती 10715 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे

नमून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 A प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सा फौजदार मिलिंद जवंजाळ, पोहे का गजानन इंगळे, पोहेका संदीप डाबेराव, संजय वराडे, राहुल ससाने, पो का कैलास सुरडकर, विनोद भोजने, रवींद्र सावळे, सुनील सपकाळ, रवींद्र झगडे, यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments