दुसर बीड प्रतिनिधी -गुलशेर शेख
दुसरबीड दिनांक 7
दिनांक 7/06/2025 रोजी सकाळी 3.15 वा दरम्यान समृद्धी महामार्गावर चै.न.312.8 मुंबई कॉरिडोर वर पूजा ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. सविस्तर वृत्त असे की पूजा ट्रॅव्हल्स नागपूर वरून पुणे येथे जात असताना चॅनेज नंबर 312 .8 जवळ सदर ट्रॅव्हल्स समोर जात असलेल्या ट्रेलर ट्रक क्रमांक PB-06-V-5180 ला लोखंडी सळई घेऊन जात असताना सदर ट्रॅव्हल्सचा चालक विनोद सुधाकर पखाले व 40 वर्षे रा. वर्धा याला समोरील ट्रेलर चा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्सल क्लिनर साईडला समोरून धडकली . यामध्ये प्रवास करीत असलेले प्रवासी कल्पना रमेश नासरे वय 30 वर्ष राहणार नागपूर. यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. सदर जखमी यांना तात्काळ समृद्धी महामार्ग 108 ॲम्बुलन्स चे डॉक्टर वैभव बोराडे व चालक दिगंबर शिंदे यांनी उपचारा कामी जालना येथे घेऊन गेले. व अथर्व देशमुख वय 24 वर्ष रा. वर्धा. विक्की मानसिंग चव्हाण वय 30वर्षे रा.शिवनी मध्य प्रदेश असे दोन जण किरकोळ जखमी झाले. त्यांना जागेवरच डॉक्टर स्वप्निल सुसर व चालक पडघान यांनी प्रथमउपचार केले. सदर ट्रॅव्हल्स मध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करीत होते. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ महामार्ग पोलीस चे पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे, अरुण भुतेकर .संदीप किरके . विजय आंधळे यांनी महाराष्ट्र सुरक्षा बल चे जवान भुसारी, राठोड यांच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स ला सुरक्षित बॅरीकेटिंग करून वाहतूक नियंत्रण केले. तसेच पोलीस स्टेशन बिबी चे ठाणेदार संदीप पाटील , पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण मोहिते, सांगळे यांनी इतर प्रवासी यांना पर्यायी वाहनाने पुढील प्रवासासाठी रवाना केले. तसेच सदर अपघात ग्रस्त ट्रॅव्हल्स व ट्रेलर वरील लोखंडी खाली पडलेल्या सळई QRV टिमचे श्रीकृष्ण बछीरे ,आकाश राठोड, दिगंबर इंगोले यांनी दोन्ही वाहने सुरक्षित बाजूला घेऊन महामार्ग मोकळा केला. दैव बलत्वर म्हणून सदर ट्रॅव्हल्स मधील इतर प्रवासी सुखरूप वाचले . ट्रॅव्हल्स डाव्या बाजूस पूर्णपणे चिरत गेली असतील तर मोठा अपघात घडला असता. सदर अपघाताबाबत पोलीस स्टेशन बीबी अधिक तपास करीत असून पुढील कारवाई करीत आहे.






Post a Comment
0 Comments