Type Here to Get Search Results !

जमिनीच्या आरोग्य पत्रकाद्वारे विद्यार्थ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 जमिनीच्या आरोग्य पत्रकाद्वारे विद्यार्थ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन 

जळगाव (जा):सोपान पाटील 

 

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी 25 जून रोजी त्यांच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे सुलज येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधून माती परीक्षण व जमिनीच्या आरोग्य पत्रकाद्वारे विद्यार्थ्यांनी सुलाज येथील शेतकऱ्यांना माती मधील होणारे असंख्य बदल तसेच मातीतील पोषक तत्व विषयी व रासायनिक गुणधर्म व त्यांच्यापासून होणारे फायदे याविषयी स्थानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून संपूर्ण माहिती दिली.तसेच सरपंच लताताई टापरे यांनी सहकार्य केले , माती परीक्षणासाठी विद्यार्थी मोहित काळमेघ,गौरव गायकी, दिपक देशमुख, मयूर फुले, प्रतीक चंदनसे या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई सर व कार्यक्रमाचे अधिकारी अविनाश आटोळे सर व समन्वय प्रमोद डव्हळे सर व विषयतज्ञ एस पी काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला

Post a Comment

0 Comments