समाजवादी पार्टीच्या लेटरहेडचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाईची मागणी..
बुलढाणा, दि. २४ जून २०२५ —
जयपूर (ता. मोताळा, जि. बुलढाणा) येथील सय्यद युसुफ सय्यद मुसा या व्यक्तीने समाजवादी पार्टीच्या अधिकृत लेटरहेडचा बनावट वापर करून पक्षाच्या नावे खोटे पत्रक तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या गंभीर प्रकरणाची वरिष्ठ नेत्यांकडे लेखी तक्रार करून समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा युवा अध्यक्ष आझाद पठाण यांनी या बनावट कृत्याची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदर बनावट लेटरहेडचा वापर समाजात गोंधळ आणि गैरसमज निर्माण करण्यासाठी करण्यात आला असून, या प्रकारामुळे पक्षाची आणि प्रदेशाध्यक्ष मा. अबू आसीम आझमी यांची प्रतिमा मलीन करण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येतो.
युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, समाजवादी पार्टी ही सामाजिक न्याय आणि प्रामाणिक राजकारणावर विश्वास ठेवणारी संघटना आहे. अशा बनावट व दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना पक्ष कधीही सहन करणार नाही.
“पक्षाच्या अधिकृत लेटरहेडचा गैरवापर करणे हे गंभीर गुन्हा असून, यावर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा अशा प्रकारांना खतपाणी मिळून पक्षाच्या प्रतिमेवर विपरित परिणाम होऊ शकतो,” असे आझाद पठाण यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून संबंधित व्यक्तीविरोधात पक्षीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्येही जोर धरू लागली आहे.
— समाजवादी पार्टी, बुलढाणा जिल्हा
प्रेषक: आझाद पठाण, युवा जिल्हाध्यक्ष
संपर्क: 8625892288

Post a Comment
0 Comments