जागतिक योग दिनी" उत्साहात योगासने*
वडगाव (पाटण)
जळगाव जामोद: सोपान पाटील
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलंग्नित स्वा. विर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद, येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त ग्राम वडगाव (पाटण) येथील प्राथमिक शाळेत योगा शिबिराचे आयोजन केले. विद्यार्थिनींनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे फायदे समजावून सांगितले. त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, प्राणायाम,वृक्षासन, कपालभाती यांसारख्या आसनांचा सराव करण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष चंद्रभान वाघोडे व शाळा समिती अध्यक्ष डॉ.जाधव सर तसेच गावातील ग्रामसेविका सौ. प्रगती पुंगळे, प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षकवृंद व काही गावकरी कार्यक्रमाला उपस्थित होते.सदर कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई सर कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखडे आणि विषयतज्ञ प्रा.जिव्हेश साळी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी राऊत,ज्ञानेश्वरी सपकाळ, कोमल भोपळे,निकिता ढोले, प्राची तिजारे ,आरती टापरे, संजना बंड,शिवानी बोरोकार यांनी कार्यक्रम पार पाडला.योग दिनानिमित्त राबवण्यात आलेला हा उपक्रम आरोग्यपद व प्रेरणादायी ठरला.

Post a Comment
0 Comments