Type Here to Get Search Results !

खंडणी प्रकरणातील आरोपी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी नसताना लेटर पॅडचा गैरवापर करीत होते.. जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस...

 खंडणी प्रकरणातील आरोपी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी नसताना लेटर पॅडचा गैरवापर करीत होते.. जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद शहरातील सर्व आरा मशीन मालकांनी खंडणी मागणाऱ्या  समाजवादी पार्टीचा तथाकथित पदाधिकारी असलेल्या शेख सईद शेख कदीर व त्यांचा सोबती सय्यद युसुफ सय्यद मुसा यांच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(५)५(३) नुसार खंडणी प्रकरणी शेख सईद व सय्यद युसुफ यांचेवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी २१ जून रोजी  खंडणी प्रकरणातील आरोपी शेख सईद व सय्यद युसुफ यांची पक्षातुन ३ महिन्यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली असून समाजवादी पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.. दोघेही ब्लॅकमेलिंग द्वारे सरकारी कर्मचाऱ्यांना धाऱ्यावर धरून समाजवादी पार्टीच्या लेटर पॅडचा वापर अधिकारीऱ्यांच्या खोट्या तक्रारी करण्यासाठी  करीत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी दूरध्वनीवरून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांना दिल्याने त्या दोघांचीही पक्षातून हाकालपट्टी करा असे स्पष्ट आदेश जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांना दिले.त्यामुळे समाजवादी पक्षातून दोघांचीही हकालपट्टी करण्यात आली.त्यानंतर लेखी आदेशच समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र पदाधिकारी परवेज सिद्दिकी यांचे सह  लियाकत खान यांनी दिले होते.समाजवादी पार्टीची नवीन जिल्हा कार्यकारणी जाहीर केल्यानंतर कार्यरत असलेली पूर्वीची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.शेख सईद शेख कदीर व सय्यद युसुफ हे दोघे पदाचा दुरुपयोग करून अधिकारी व सर्वसामान्यांना वेठीस धरत होते.सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळेच पार्टीची बदनामी होत असल्याकारणाने त्यांना पार्टीतून काढण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले तसेच नवीन जाहीर कार्यकारणीच्या प्रती सर्व पोलीस स्टेशन व सर्व कार्यालयांमध्ये दिल्याचेही समाजवादी पार्टीचे  जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments