नागरे महाविद्यालयाने योग दिनाच्या निमित्ताने 21 पिंपळाच्या वृक्षांची केली लागवड.
गुलशेर शेर .
स्थानिक दुसरबीड दि 21 नारायणराव नागरे महाविद्यालयामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदे मध्ये त्यांनी 21 जून हा जागतिक योग दिन साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता तेव्हा पासून 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली आहे तेव्हापासून आमच्या महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या वतीने यावर्षी अकरावा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला यानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय नागरे आधीसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच कार्यक्रमाधिकारी यांनी या योग दिनाच्या निमित्ताने *एक पृथ्वी एक स्वास्थ्यासाठी योग* या थीम नुसार 21 पिंपळाची वृक्ष लावण्याची संकल्पना मांडली आणि पिंपळ वृक्षांची लागवड केली तसेच महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापकास तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यास पिंपळाचे एक वृक्ष आपण लावावं अशी इच्छा व्यक्त केली या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर डी एस देशमाने, प्राध्यापक डॉक्टर जी एस घुगे, प्राध्यापक शेख युनूस, प्राध्यापक जगदीश यादव ,प्राध्यापक देवानंद नागरे, प्राध्यापक महेर सर,प्राध्यापक सत्यम सर, प्राध्यापक नयना मॅडम, प्राध्यापक बी डी शिंदे ,प्राध्यापक मिलिंद गवई, तसेच बी एस पंढरे,बी जी कायंदे ,अनिल रणमळे आदी शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments