सोलापूर धुळे एम एच 52 महामार्गावर
प्राणांतिक अपघात
गुलशेर शेख
आज दिनांक 20/06/2025
*रोजीnसायंकाळी 05.45 वाजेच्या दरम्यान धुळे सोलापूर महामार्ग NH 52 जामखेड फाटा येथे मोटरसायकल क्रमांक MH 21 BW 1850 विश्वकांत शिंदे वय 35 वर्ष हे त्यांच्यावरील मोटरसायकलवर त्यांची पत्नी शीला विश्वकांत शिंदे वय 35 वर्ष मुलगी परी विश्वकांत शिंदे वय 04 वर्षे व छोटी विश्वकांत शिंदे वय एक वर्ष हे बीड ते संभाजीनगर जात असताना पाठीमागून ट्रक क्रमांक KA56-4201 या चालकाने त्याची ट्रक ही भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून सदर मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटरसायकल वरील शीला विश्वकांत शिंदे व परी विश्व कांत शिंदे या दोघी ट्रकच्या चाकाखाली येऊन मार लागून मुलगी परी ही जागीच मयत झाली तिची आई शीला ही हॉस्पिटलला नेत असताना मयत झाली मोटरसायकल चालक विश्वकांत शिंदे व छोटी मुलगी यांना किरकोळ मारा लागला या सर्वांना तात्काळ आय आर बी अंबूलसने घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर येथे रवाना केले व सदर अपघातग्रस्त मोटरसायकल बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे
अपघातात मदत
सदर अपघातामध्ये आम्ही प्रभारी अधिकारी आर के निकम सोबत Asi/राम चव्हाण व HC /1360 जीडी गोल्डे महामार्ग पोलीस केंद्र जालना व पोलीस स्टेशन अंबड येथील हेडकॉन्स्टेबल/263 रवींद्र चव्हाण तसेच आय आर बी चे डॉ.विजय धारकर, रवी गाडेकर आत्माराम गाडेकर अंबुलन्स चालक
आय आर बी चे पेट्रोलिंग कर्मचारी विकास जाधव ,शिवचरण ,जाधव चंद्रशेखर तसेच बबन लोंढे अभिषेक शिरसकर या सर्वांनी सदर अपघातामध्ये मदत करून जखमी व मयत यांना तात्काळ अंबुलन्स मध्ये टाकून घाटी हॉस्पिटल येथे रवाना केले व अपघातग्रस्त वाहन बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे.





Post a Comment
0 Comments