Type Here to Get Search Results !

ब्लॅकमेलिंग करून दर महिन्याला दहा हजार रुपये महिना दे म्हणणाऱ्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल..

 ब्लॅकमेलिंग करून दर महिन्याला दहा हजार रुपये महिना दे म्हणणाऱ्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

महिन्याला आठ -दहा हजार रुपये दे अन्यथा  साँ मिल चालू देणार नाही.. ब्लॅकमेलिंग द्वारे पैशाच्या मागणी करणाऱ्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. खंडणी मागितल्याची तक्रार दिनांक १९ जुन रोजी जळगाव जामोद शहरातील आरा मशीन मालकांनी एकत्रित येऊन दिली आहे. लाकूड कटाई चे काम करणारे जळगाव जामोद शहरातील निंभोरा रोडवरील आझाद साँ मिल येथे आरा मशीन मालक इमरान शफाकत अली खान काम करीत असताना शेख सईद शेख कदिर यांचेसह सय्यद युसुफ सय्यद मुसा यांनी येऊन दर महिन्याला आठ ते दहा हजार रुपये महिना दे, मागील तीन दिवसापासून मी तुला बोलत आहे समजत नाही का, धंदा करना है तो मुझे दस हजार रुपये महिना दो, असे म्हणून खंडणीची मागणी केली त्यावर फिर्यादी इम्रान शफाकत अली खान यांनी म्हटले माझ्याजवळ पैसे नाही आहेत त्यावेळी शेख सईद शेख कदीर व सय्यद युसुफ या दोघांनी शिवीगाळ करून तुमच्या विरुद्ध एखाद्या बाईला उभे करून खोटी तक्रार द्यायला लावेल, व खोट्या केसेस करून तुम्हाला अडकविल अशी धमकी दिल्याने जळगाव जामोद शहरातील  मोहम्मद सलीम मोहम्मद शरीफ (भारत सॉ मिल), शेख मोहम्मद शेख अब्बाज (बिसमील्ला सॉ मिल), बाबर खान अमानउल्ला खान (नेक नाम सॉ मिल), रामनिवास मनोहरलाल यादव (खातु सॉ मिल), आनंदकुमार गिरझारीलाल शर्मा (श्री लक्ष्मीनारायण सॉ मिल) असे यांचे सह सर्व मशीन मालकांनी एकत्रित येऊन जळगाव जामोद पोलीस स्टेशनला शेख सईद शेख कदीर व त्याचा सहकारी सय्यद युसुफ सय्यद मुसा यांच्या विरोधात खंडणी मागितल्याची तक्रार दिल्याने दोघांवरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नारायण सरकटे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments