Type Here to Get Search Results !

ट्रक आणि दूचाकीची जोराची धडक दुचाकी वरील दोघे गंभीर यवतमाळला हलविले

 ट्रक आणि दुचाकीची जोराची धडक ; 

दुचाकीवरील दोघे गंभीर यवतमाळला हलविले




दुचाकीवरील दोघांचे पाय चेंदामेंदा ; आसोली फाट्यानजीकची घटना"

उपसंपादक:-आशिष वानखडे

श्रीक्षेत्र माहूर :- माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील वाई बाजार पासून जवळच असलेल्या आसोली फाट्यावर बोअरवेल मशीनवाहक ट्रकने कामावरून मोटरसायकल द्वारे  परत येत असलेल्या दुचाकीस्वारांना जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. १३ रोजी सकाळी ७वाजता घडल्याने दोन्ही युवकांचे पाय कापण्यासारखि परिस्थिती निर्माण झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे,


  माहूर तालुक्यातील कासारपेठ आश्रमशाळा परिसर येथील लिंगू शंकर आडे, वय २८ व संजय तुकाराम येरमे, वय २३ वर्षे हे दोन युवक आज सकाळी त्याची दुचाकी क्र. एम.एच. २६ बी.आर. ६३०९ या दुचाकीने  माहूर येथे काही कामानिमित्त गेले होते. तेथून परत येत असताना सकाळी ७ वा. च्या सुमारास माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील वाई बाजार पासून जवळच असलेल्या आसोली फाट्यानजीक वाई बाजार कडून माहूरकडे जात असलेल्या बोअरवेल मशीन वाहक ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवकांच्या उजव्या पायाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून मांडीच्या हाडाच्या ठिक-या उडाल्या तर एकाच उजवा हात आणि उजव्या पायाची बोटे पण मोडलेली आहेत,


 अपघाताची माहिती मिळताच वाई बाजार प्रा, आरोग्य केंद्राचे रुग्णवाहिका चालक गणेश कोरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ दोन्ही जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विपीन बाभळे, यांच्यासह त्याच्या सहका-यांनी प्राथमिक उपचार करून दोन्ही जखमी युवकांना पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात पाठविले आहे,

माहूरच्या ग्रामीण रुग्णालयाची १०८ ॲम्बुलन्स अनेक दिवसापासून नादुरुस्त असल्याने सतत होत असलेल्या अपघातातील जखमींना बाहेरगावी उपचारासाठी पाठवण्यास अडचण निर्माण होत असल्याने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दोन १०८ ॲम्बुलन्स द्यावे अशी मागणी होत आहे,

Post a Comment

0 Comments