Type Here to Get Search Results !

हजारो वर्षांपूर्वीचे अति प्राचीन श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे 17 जून रोजी नांदुरा नगरीत आगमन

नांदुरा प्रतिनिधी. देवेंद्र जयस्वाल 

 हजारो वर्षांपूर्वीचे अतिप्राचीन श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे १७ जून रोजी नांदुरा नगरीत आमगामन.

नांदुरा प्रतिनिधी/ हजारो वर्षांपूर्वीचे महादेवाचे अतिप्राचीन ज्योतिर्लिंग श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे येत्या १७ जून रोजी नांदुरा येथे आगमन होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज पासून एक हजार वर्षांपूर्वी इ.सन १०२६ मधे भारतावर परकीय आक्रमण झाले होते.या परकीय आक्रमणात श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता.परंतु स्थानिक पुजाऱ्यांनी या ज्योतिर्लिंगाचे अवशेष जपले.आज तेच अवशेष गुरुदेव श्री.श्री.श्री. रविशंकरजी यांच्या माध्यमातून आपल्या नांदुरा येथे श्री जबलेश्र्वर संस्थान नांदुरा खुर्द येथे दिनांक १७ जून २०२५ रोजी पहाटे पोहचणार असून श्री जब्लेश्र्वर संस्थान येथे सकाळी ८:३० मिनिटांनी रुद्रपुजा व दर्शन खुले राहणार असून सकाळी १० ते १२ पर्यंत सत्संग आयोजित करण्यात आला आहे. पंचक्रोशीतील समस्त शिव भक्तांना या शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.तरी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार नांदुराच्या सौजन्याने हे भाग्य नांदुरा वासियांना प्राप्त होत असून सर्व भाविकांनी अतिप्राचीन असे श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार नांदुरा तर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments