Type Here to Get Search Results !

शिंदीच्या जान्हवीचा पुण्यात डंका

कुठलाही शिकवणी वर्ग न लावता ८७ .८८ % मिळवले गुण ,

नुकताच १३ मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला अतिशय महत्त्वाचा निकाल हा दहावीचा मानला जातो , या निकालामध्ये मुलापेक्षा मुलींनी चांगलीच बाजी मारली आहे बारावीच्या निकालामध्ये सुद्धा मुलीच आघाडीवर होत्या ,

 काही विद्यार्थ्यांनी खरोखरच प्रचंड मेहनत घेत कुठलीही शिकवणी वर्ग न लावता घवघवीत यश संपादन केले ,

सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथील किशोर मधुकर खंडारे हे पुणे येथे नोकरीला आहेत असं म्हणतात पुणे तिथे काय उणे ' पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटले जाते ते उगीच नाही , किशोर खंडारे यांनी आपली मुलगी पुणे येथील एंजल हायस्कूल हडपसर येथे शिक्षणाकरता दाखल केली ,

बघता बघता दहावीची परीक्षा आली आणि मुलीने सुद्धा वडीलांच्या अपेक्षांना खरे केले '

जान्हवी हिने प्रचंड अभ्यास करत कुठल्याही प्रकारचे शिकवणी वर्ग न लावता ८७ . ८८ % गुण मिळवत ग्रामीण भागातील मुली सुद्धा काही कमी नाही हे दाखवून दिले आहे '

शिंदी भागातून पुण्यासारख्या शहरांमध्ये शिक्षण घेत असताना सुद्धा तिने पुण्यात मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्याचा डंका वाजवला आहे ' जान्हवी खंडारे हिने मिळवलेल्या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ,

जान्हवी हिला पुढे डॉक्टर बनायची इच्छा आहे '

तिने आपले संपूर्ण श्रेय आई वडील शिक्षकांना दिले आहे .

Post a Comment

0 Comments