नांदुरा | 15 मे 2025
९ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी – समाजवादी पार्टीची मागणी
आज नांदुरा पोलीस स्टेशन येथे समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष मा. आझाद पठाण यांनी पिंपळगाव राजा येथील ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर केले.
दिनांक १४ मे २०२५ रोजी खामगाव तालुक्यातील पेठपुरा भागात घडलेली ही घटना संतापजनक असून, आरोपी रेहान खान मुक्तार खान याने केलेल्या कृत्याने माणुसकीला काळीमा फासला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही तासांतच आरोपीला अटक केली, याबद्दल पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन व अपर पोलीस अधीक्षक मा. श्रेणिक लोढा यांचे त्यांनी निवेदनातून कौतुक केले.
मात्र, समाजवादी पार्टीचा ठाम आग्रह आहे की, केवळ अटक ही पुरेशी नाही. या क्रूर गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा – फाशी – देऊन समाजात एक उदाहरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकरणांची जलदगतीने सुनावणी होऊन पीडितेला न्याय मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत मा. आझाद पठाण यांनी व्यक्त केले.
निवेदन देत्या वेळी इफ्तिकार भैया,अझर मिर्झा, मुशर्रफ शाह,तोसीफ खान , शेख नदीम,तोसीफ बिल्डर शेख राजीक साजिद कुरेशी व इतर समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते


Post a Comment
0 Comments