सिंदखेड राजा :-आज 13 मे रोजी लागलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये मलकापूर पांगरा येथील कै विजय मखमले मराठी माध्यमिक विद्यालय चा 98.43% तर कै विजय मखमले उर्दू माध्यमिक विद्यालय चा 100% निकाल लावत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे कै विजय मखमले मराठी माध्यमिक मध्ये प्रथम अथर्व दिनकर घुगे 94.40%,द्वितीय कु.पुनम विकास गिराम 92.80%,तृतीय कु.ॠतुजा सुनील उगले 91.20%, घेऊन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता राखली आहे तसेच कै विजय मखमले उर्दू माध्यमिक विद्यालय मध्ये प्रथम क्रमांक अल्फीया परवीन शेख रुस्तम 87.20% दुतीय फिरदोस बि फेरोज खान 83.40%
तुतीय शबनम परवीन जियाउल्ला खान 83.20% या
विद्यार्थ्यांनी पटकावला आहे उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अरुण मखमले यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments