Type Here to Get Search Results !

गोपाल दातकर यांना हाय कोर्टा कडून अंतरिम जामीन मंजुर.मजीप्रा च्या अधिकारीला शिवीगाळ प्रकरण


अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे

अकोला-शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्याशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अकोट येथील अधिकाऱ्याने संजय आठवले यांचा फ़ोन वरून संवाद साधला व संवादा दरम्यान गोपाल दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ व खंडणी मगितल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात विविध कलमांव्यये गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान अकोट सत्र न्यायालयात २१ एप्रिल रोजी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असता दातकर यांचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. दरम्यान त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली न्या वृषाली जोशी यांच्या बेंचसमोर 13 मे रोजी झालेल्या सुनावणीत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

गोपाल दातकर हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असून त्यांच्या सर्कलमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अंतर्गत काम सुरू आहे. या कामाच्या संदर्भात त्यांनी मजीप्राच्या अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला. या दरम्यान दोघांमध्ये चांगलाच वाद झाला फिर्यादी यांनी तक्रारीत दाखल केल्याप्रमाणे जातीवाचक शिवीगाळ करून खंडणी देखील मागितल्याचे नमूद केले आहे.त्यामुळे या प्रकरणात अकोट येथे झालेल्या २१ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे विरोध करण्यात आला व जमानात अर्ज फेटाळून लावला होता.

दरम्यान गोपाल दातकर यांनी उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर येथे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला असता न्यायाधीश मा वृषाली जोशी यांनी १३ मे रोजी त्यांना दोन्ही बाजू ऐकून १५००० रुपयाच्या जात मुचालका आणि अर्जदारास आठवड्यातून एकदा म्हणजे मंगळवारी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत संबंधित पोलिस ठाण्यात उपस्थित राहावे लागेल आणि आवाजाचा नमुना देऊन तपास यंत्रणेला सहकार्य करावे लागेल या अटी वर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अर्जदाराच्या वतीने ॲड. आनंद राजन देशपांडे आणि ॲड. श्रीराम धैर्यवर्धन पुंडकर यांनी बाजू मांडली.

Post a Comment

0 Comments