Type Here to Get Search Results !

प्रो . जावेद खान उर्दू हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

 प्रो.जावेदखान उर्दू हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

दुसरबीड येथील प्रो.जावेदखान उर्दू हायस्कूलने यावर्षीच्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेत शंभर टक्के निकालाची उजळ कामगिरी केली आहे. एकूण ३० विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसून सर्वजण उत्तीर्ण झाले आहेत.

           अहेतेशामअली मुदस्सर शेख याने ८९.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकावर शेख मुज्तबा मो.फहीम (८७.८०%) आणि तिसऱ्या क्रमांकावर सैय्यद सोहील सैय्यद फहीम (८६.६०%) यांनी स्थान मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नाज जुल्फकार शेख (८३.४०%), जोया सैय्यद जफर (८३.२०%) आणि मदीहा समीर कुरेशी (८३%) यांचा समावेश आहे. एकूण १९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर उर्वरित ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

             शाळेच्या या उत्तम निकालाबद्दल शाळेचे अध्यक्ष इरफानअली शेख व मुख्याध्यापक सादिक शेख यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments